नंदुरबारमध्ये शेतक:यांना सुलभ पिककर्ज जिकिरीचे

By Admin | Published: June 23, 2017 05:02 PM2017-06-23T17:02:57+5:302017-06-23T17:02:57+5:30

कजर्माफीत पुन्हा अडचणी : जिल्हा बँकेच्या शाखांमध्ये ठणठणाट

Farmers of Nandurbar: They have easy cash crops | नंदुरबारमध्ये शेतक:यांना सुलभ पिककर्ज जिकिरीचे

नंदुरबारमध्ये शेतक:यांना सुलभ पिककर्ज जिकिरीचे

googlenewsNext

 ऑनलाईन लोकमत

नंदुरबार,दि.23-जिल्ह्यात राष्ट्रीयकृत बँका सुलभ पीक कर्ज योजनेंतर्गत विविध गावांमध्ये जाऊन शेतक:यांना कर्ज वाटप करत आहेत़ यामुळे पहिल्यांदा कर्ज घेणारे शेतकरी सुखावले आहेत़ तर दुसरीकडे जिल्हा बँकेकडे कजर्माफीसाठी बँकेकडे अर्जाची पूर्तताही न झालेल्या शेतक:यांना आगाऊ रक्कम देण्यासाठीही बँकेकडे पैसे नाहीत़ 
नंदुरबार जिल्ह्यात जिल्हा बँकेचे तब्बल 14 हजार 498 शेतकरी हे गेल्या वर्षाचे पीक कर्जातील थकबाकीदार आहेत़ हे शेतकरी अल्पभुधारक असल्याने ते कजर्माफीसाठी पात्र ठरणार आहेत़ या पात्र खातेदारांना देण्यात येणा:या 10 हजाराची तरतूद करण्यास सद्यस्थितीत ही बँक असमर्थ ठरत आह़े धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने नंदुरबार जिल्हा अग्रणी बँकेला केलेल्या पत्रव्यवहारानुसार बँकेला नंदुरबार जिल्ह्यात पात्र ठरणा:या शेतक:यांना शासन तरतूदीनुसार प्रत्येकी 10 हजार रूपये वाटपासाठी कर्ज देण्याची मागणी करण्यात आली आह़े अग्रणी बँकेने 38 कोटी रूपयांच्या या कर्जासाठी ग्रामीण बँकेच्या मुंबई शाखेकडे शिफारस करण्याची अपेक्षा जिल्हा बँकेने व्यक्त केली आह़े  शासनाने दिलेल्या कजर्माफीसाठी पात्र शेतक:यांना साधी अॅडव्हान्स   रक्कम देण्यापूर्वीच कर्जासाठी दुस:या बँकेकडे हात पसरणा:या जिल्हा बँकेच्या अजब कारभारामुळे खातेदार शेतकरी अडचणीत येणार आहेत़  
जिल्ह्यात एकीकडे कजर्माफीच्या निकष आणि अटी सातत्याने बदलत असताना, केंद्राची सुलभ पीक कर्ज योजना जोमात सुरू आह़े शेतक:यांच्या दारार्पयत जाऊन जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बँका कर्ज देत आहेत़ 

Web Title: Farmers of Nandurbar: They have easy cash crops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.