रस्ता वाहून गेल्याने शेतक:यांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2019 12:27 PM2019-09-23T12:27:29+5:302019-09-23T12:27:29+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क ब्राrाणपुरी : शहादा तालुक्यातील जवखेडाहून धारेश्वरमार्गे गोगापूरकडे जाणा:या रस्त्यानजीक असलेल्या नाल्याला पूर आल्याने जवखेडा-धारेश्वर रस्ता वाहून ...

Farmers: The plight of the road as it flows | रस्ता वाहून गेल्याने शेतक:यांचे हाल

रस्ता वाहून गेल्याने शेतक:यांचे हाल

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
ब्राrाणपुरी : शहादा तालुक्यातील जवखेडाहून धारेश्वरमार्गे गोगापूरकडे जाणा:या रस्त्यानजीक असलेल्या नाल्याला पूर आल्याने जवखेडा-धारेश्वर रस्ता वाहून गेल्याने शेतक:यांसह नागरिकांना जीव मुठीत धरून पुढील प्रवास करावा लागत आहे.
सविस्तर वृत्त असे की, शहादा तालुक्यात गेल्या महिनाभरापासून पावसाची रिपरिप सुरू आहे. मागील महिन्यात  झालेल्या जोरदार पावसामुळे सर्वच नदी-नाल्यांना मोठय़ा प्रमाणावर पूर आले. शहादा तालुक्यातील जवखेडाहून धारेश्वरमार्गे गोगापूरकडे जाणा:या रस्त्यालगत शेतशिवारातून वाहून येणारा नाला आहे. हा नाला धारेश्वरजवळील सुखनाई नदीला मिळतो. या नाल्यावर भराव करून शेतकरी व प्रवासी ये-जा करतात.  परंतु मागील महिन्यात 9 ऑगस्ट रोजी  रात्री या नाल्याला मोठा पूर आल्याने रस्ताच वाहून गेल्याने दीड महिन्यापासून जीव मुठीत धरून पुढील प्रवास करावा लागत आहे. जवखेडा येथून धारेश्वर व गोगापूरकडे जाण्यासाठी हा मार्ग सोयीचा आहे. या परिसरातील ब्राrाणपुरी, जवखेडा, भागापूर येथील ग्रामस्थांची शेतीही याच रस्त्यावर आहे. या नाल्यावर पूल नसल्याने शेतकरी व इतर प्रवाशांना अनेक अडचणींना सामोरे जात प्रवास करावा लागतो. पावसाळ्यात नाल्याला जास्त प्रमाणात पाणी आले तर या नाल्यावरील रस्ता वाहून जातो. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. रस्ता वाहून गेल्याने शेतक:यांना ट्रॅक्टर ,बैलगाडी, शेतमाल घेऊन जाणारी इतर वाहने घेऊन जाण्यास अडचणींचा सामना करावा लागतो. सध्या पिकांना खते देणे आवश्यक आहे. मात्र शेतक:यांना शेतात खते नेण्यासाठी रस्ता वाहून गेल्याने त्रास सहन करावा लागत  आहे.
 या रस्त्यावर दोन नाले आहेत. जवखेडाजवळील नाल्यावर पूल बांधला गेला असून पुढील नाल्यावर पूल नसल्याने हाल होतात. जवखेडा येथील स्मशानभूमी धारेश्वर येथे असल्याने त्यांना पावसाळ्यात पुलाअभावी अंत्ययात्रा नेताना वळणमार्गाने जावे लागते. 

धारेश्वर येथे प्राचीनकालीन महादेवाचे मंदिर आहे. त्यामुळे येथे भाविकांची  दर्शनासाठी नेहमी वर्दळ असते. मंदिरावर भाविकांतर्फे बाराही महिने धार्मिक कार्यक्रम होतात. परंतु रस्ताच वाहून गेल्याने भाविकांना धारेश्वर या धार्मिकस्थळावर जाण्यासाठी प्रचंड कसरत करीत पोहोचावे लागत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे. नाल्यावरील रस्ता वाहून गेल्याने वाहने जाऊ शकत नसल्याने बाहेरुन येणा:या भाविकांना पायपीट करावी लागत आहे.
 

Web Title: Farmers: The plight of the road as it flows

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.