पिके वाचविण्यासाठी शेतक:यांची कसरत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2018 12:48 PM2018-06-02T12:48:50+5:302018-06-02T12:48:50+5:30
मोदलपाडा परिसर : विहिरी व कूपनलिकांनी गाठला तळ, उत्पन्नाअभावी आर्थिक नुकसानीची शक्यता
लोकमत न्यूज नेटवर्क
मोदलपाडा : तळोदा तालुक्यातील मोदलपाडा परिसरात गेल्यावर्षी कमी प्रमाणात पाऊस पडल्यामुळे विहिरी व बोअरवेलच्या पाणी पातळीत कमालीची घट झाली आहे. उन्हाळी पिकांना पुरेसे पाणी मिळत नसल्याने उत्पन्नात घट येऊन शेतक:यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागणार आहे.
यंदा जानेवारी, फेब्रुवारी, मार्चमध्ये बोअरवेल व विहिरींची पाण्याची पातळी दिवसेंदिवस खोल गेली. मे महिन्यात तर कमालीची घट होऊन पेरणी केलेल्या पिकांना पाणी देण्यासाठी शेतक:यांना कसरत करावी लागत आहे. मोदलपाडा, आंबागव्हाण, रापापूर, राणीपूर, इच्छागव्हाण, रोझवा पुनर्वसन, मौलीपाडा, लक्कडकोट, अलिविहीर, चौगाव, अमोणी, वरपाडा, सावरपाडा, पाडळपूर, रेवानगर पुनर्वसन, राजविहीर या परिसरातील शेतकरी बोअरवेलमध्ये वाढीव पाईप टाकून पिके वाचविण्यासाठी कसरत करीत आहेत. बहुतके शेतक:यांच्या बोअरवेल दिवसभरात फक्त दोन तास चालत आहेत. बागायती कापूस लागवड व उसाला पाणी देणे आवश्यक आहे. मात्र पुरेसे पाणी उपलब्ध होत नसल्याने शेतकरी हताश झाले आहेत. काही ठिकाणी तर गुरांसाठीही पाणी उपलब्ध करताना कसरत करावी लागत आहे. काही पशूपालकांनीही पाण्याअभावी दुसरीकडे स्थलांतर केले आहे.