पीके करपतांना पाहून शेतक:यांना अश्रू अनावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2018 01:01 PM2018-10-28T13:01:17+5:302018-10-28T13:01:21+5:30
रमाकांत पाटील । लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : दुष्काळाची भिषणता आता जनमानसातील हृदयाला वेदना देणारी ठरत आहे. त्याचा प्रत्यय ...
रमाकांत पाटील ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : दुष्काळाची भिषणता आता जनमानसातील हृदयाला वेदना देणारी ठरत आहे. त्याचा प्रत्यय नंदुरबार तालुक्यातील पळाशी परिसरात शेतक:यांच्या शेतावर फेरफटका मारल्यावर दिसून येतो. या परिसरातील जवळपास 15 किलोमिटरच्या भागात जमिनीतील पाणीच आटल्याने बागायती पीके करपू लागली आहे. लाखो रुपयांच्या उत्पन्नाची अपेक्षा असतांना उत्पन्न तर गेलेच पण झालेला खर्चही भरून निघणार नसल्याने शेतक:यांची अक्षरश: झोप उडाली आहे.
या वर्षीचा दुष्काळ अतिशय भयानक असेल याची चाहूल सुरू झाली आहे. पाऊसच नसल्याने या वर्षी जमिनीतील पाण्याची पातळी दिवसेंदिवस खोल खोल जात आहे. त्यामुळे एरव्ही डिसेंबर-जानेवारी महिन्यार्पयत सुस्थितीत चालणा:या विहिरी आतापासूनच कोरडय़ा झाल्या आहेत. परिणामी या पाण्यावर अवलंबून पिकांचे नियोजन करणा:या हजारो शेतक:यांचा जीव मेटाकुटीस आला आहे. बहुतांश शेतकरी विहिरीतील पाण्याचा भरोवशावर कापूस आणि मिरचीचे पीक घेतात. यंदा देखील जवळपास 50 हजार हेक्टर क्षेत्रात असेच पिकांचे नियोजन शेतक:यांनी केले आहे. मात्र त्यांचे नियोजन पुरते कोलमडले आहे. या परिस्थितीचा पहाणीसाठी पळाशी, ता.नंदुरबार परिसरात भेट दिली असता तेथील शेतक:यांच्या प्रतिक्रिया हृदय पिळवटणा:या आहेत. या भागात गेल्या चार वर्षापासून पाऊस झालेला नाही. एरव्ही मार्च, एप्रिलर्पयत चालणा:या विहिरी गेल्या दोन वर्षापासून डिसेंबर जानेवारीर्पयत चांगल्या स्थितीत असतात. या उपलब्ध पाण्याचा आधारावर यावर्षीही शेतक:यांनी कापूस आणि मिरची लागवड केली. पण जुलैच्या मध्यापासून पाऊसच न झाल्याने विहिरी महिनाभरापूर्वीच कोरडय़ा झाल्या आहेत. पिकांना पाणी देणे शक्य नसल्याने सप्टेंबर महिन्यात ऐन फुलो:यात आलेले कपाशी आणि मिरचीचे पीक सध्या करपू लागले आहे. उत्पन्नाची शाश्वती आता संपली आहे. या दोन्ही पिकांची वाढ झालेली नाही. त्यामुळे कपाशीवरील जे काही दहा, बारा बोंड पक्व झाली होती तेव्हढी उमलली आहे. तर मिरचीच्या झाडावरही जेमतेम आठ,दहा मिरची लागलेली आहे. एरव्ही एकरी किमान दहा क्विंटल कापूस आणि किमान एकरी दिडशे क्विंटल मिरचीचे उत्पन्न घेणा:या शेतक:यांना यावर्षी जेमतेम एकरी अर्धा ते एक क्विंटल कापूस आणि पाच क्विंटल मिरचीचे उत्पन्न येण्याची शक्यता आहे. त्यातही अनेक शेतक:यांच्या नशीबी तेही दिसून येत नाही. हे उत्पन्न काढण्यासाठी सध्या मजूर मिळणे कठीण झाले आहे. त्यांच्या काढणीचा दरही वधारला असल्याने अनेक शेतकरी ते उत्पन्न काढण्यासही धजावत आहे. शेतातील हे निरागस चित्र पाहिल्यानंतर या परिसरातील गावेही सुन्न झाली आहेत.
आपण 30 एकर मिरची लागवड केली आहे. त्यासाठी ठिबक यावर्षीच केली. या पिकांना पाणी देण्यासाठी शेतात सहा विहिरी आहेत. तेथून पाण्याचे नियोजन होते. पण यावर्षी महिनाभरापासून विहिरी कोरडया झाल्याने पाणी देणे शक्य झाले नाही. परिसरात लांब लांब अशीच अवस्था असल्याने व धरणाची सुविधाही नसल्याने पाणी आणण्याची जिद्द असली तरी आणू शकत नाही. आजवर मिरचीवर नऊ लाख रुपये आपण खर्च केले आहे. पण उत्पन्न शून्य येणार असल्याने हतबल झालो आहे. सरकारनेच आम्हाला आता मार्ग दाखवावा. -काशिनाथ करसन पाटील, पळाशी.