शेतकऱ्यांनी बोंडअळीच्या व्यवस्थापनावर भर द्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2019 11:34 AM2019-02-13T11:34:29+5:302019-02-13T11:34:35+5:30

कोळदा : नुकसान टाळण्यासाठी शेतकºयांना तज्ज्ञांकडून मार्गदर्शन

Farmers should focus on the management of bollworm | शेतकऱ्यांनी बोंडअळीच्या व्यवस्थापनावर भर द्यावा

शेतकऱ्यांनी बोंडअळीच्या व्यवस्थापनावर भर द्यावा

Next

लहान शहादे : कापसावरील गुलाबी बोंडअळी प्रमुख नुकसानकारक कीड आहे़ त्यामुळे तिच्या व्यवस्थापनासाठी कापुस लागवडीपासून उपाययोजना राबविण्याचा सल्ला केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर येथील शास्त्रज्ञांनी केले आहे.
आदिवासी उपयोजनेअंतर्गत जागृती शिबिराचे आयोजन केंद्रीय कापुस संशोधन संस्था, नागपुर व कृषी विज्ञान केंद्र, नंदुरबारमार्फत कोळदा येथे करण्यात आले होते. शिबिरासाठी डॉ. एस. एम. वासनीक, डॉ. विनिता गोतमारे, डॉ. व्ही. चिन्नाबाबु नायक, डॉ. एस. पी. गावंडे, डॉ. बी. बी. फंड, आर. व्ही. सलामे, आर. एस. दहातोंडे, पी. सी. कुंदे, कृषी विज्ञान केंद्र आदी उपस्थित होते.
डॉ. विनिता गोतमारे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. व्ही. चिन्नाबापू नायक यांनी गुलाबी बोंडअळी व्यवस्थापनासाठी सामुहिक प्रयत्न करण्याचे आवाहन केले. डॉ. बी. बी. फंड यांनी कीटकनाशकांची सुरक्षित हाताळणी बद्दल तर डॉ. एस. पी. गावंडे यांनी कापसातील प्रमुख रोग व उपाय योजना यावर मार्गदर्शन केले. पी. सी. कुंद यांनी नंदुरबार जिल्ह्यातील गुलाबी बोंडअळीच्या प्रादुर्भावाबाबत सद्यस्थिती व उपाययोजना याबाबत माहिती दिली. जिल्ह्यातील महत्वाचे पिक असणाºया कापसापासून अधिक उत्पन्न मिळविणेसाठी कृषि विज्ञान केंद्र करत असलेल्या विविध प्रयोगांची मांडणी आर. एस. दहातोंडे यांनी केली. डॉ. एस. एम. वासनीक यांनी केंद्रीय कापुस अनुसंधान केंद्राने कापसावरील तंत्रज्ञानाच्या प्रचारासाठी सुरु केलेल्या ‘ई-कपास’ या उपक्रमाची माहिती देवून सर्व शेतक-यांना यात सहभागी होण्याचे आवाहन केले. ‘ल्युपिन’ फाऊंडेशनअंतर्गत चालनाºया कापुस प्रयोगातील शेतकरी या कार्यक्रमात मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी यु. डी. पाटील, जे. एन. उत्तरवार, आर. एम. पाटील, आर. आर. भावसार, व्ही. एस. बागल, डॉ. एम. पी. गणापुरे, गीता कदम, राहुल नवले, कल्याण पाटील, रजेसिंग राजपूत, किरण मराठे, कैलास सोनवने यांनी परिश्रम घेतले़

Web Title: Farmers should focus on the management of bollworm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.