रासायनिक खतांच्या टंचाईने शेतकरी त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2018 12:42 PM2018-08-11T12:42:10+5:302018-08-11T12:42:16+5:30

युरियानंतर आता पोटॅश मिळेना : दुहेरी संकटामुळे शेतकरी हतबल

Farmers suffer from scarcity of chemical fertilizers | रासायनिक खतांच्या टंचाईने शेतकरी त्रस्त

रासायनिक खतांच्या टंचाईने शेतकरी त्रस्त

Next

तळोदा : तालुक्यातील शेतक:यांना आसमानी संकटाबरोबरच सुलतानी संकटांचाही सामना करावा लागत असल्याने शेतकरी अक्षरश: हतबल झाला आहे. कारण त्यांना शासनाकडून पुरेशा प्रमाणात रासायनिक खते उपलब्ध होत नसल्याने शेतक:यांमध्ये मोठय़ा प्रमाणात असंतोष आहे. युरीयानंतर आता शेतक:यांपुढे पोटॅश खताची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. परिणामी पिकांचे पोषणच खुंटले आहे. जिल्हा प्रशासनाने याप्रकरणी गंभीर दखल घेवून रासायनिक खते पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून द्यावे, अशी शेतक:यांची मागणी आहे.
ऑगस्ट महिना अर्धा संपण्याच्या मार्गावर असतांना संपूर्ण तळोदा तालुक्यात अजून पावेतो नद्या-नाले दुथडी भरून आले नाही. शिवाय अद्यापर्पयत पावसाने सरासरीची निम्मेही गाठली नाही. साहजिकच शेतक:यांचे तोंडचे पाणी अक्षरश: पळाले आहे. शेतक:यांना आसमानी संकटांबरोबरच सुलतानी संकटांचाही सामना करावा लागत असल्याची त्यांची व्यथा आहे. कारण सद्या शेतक:यांना रासायनिक खतांच्या टंचाईस मोठय़ा प्रमाणात तोंड द्यावे लागत असल्याचे चित्र आहे. सुरूवातीस युरीयाची टंचाई निर्माण झाली होती. जेमतेम ते उपलब्ध झाल्यानंतर आता पोटॅश खतांचा प्रश्न उभा राहिला आहे. तुरळक पावसामुळे सर्वच पिकांची परिस्थिती उत्तम आहे. मात्र त्यात आता रासायनिक खतांनी खोडा घातला आहे. 
ऊस, केळी, पपई व कापूस या पिकांना मिश्र खतांबरोबरच पोटॅशची मात्रा देण्याची लगबग शेतक:यांनी सुरू केली आहे. परंतु नेमके पोटॅश खतच बाजारात मिळत नसल्याने मात्रा रखडली आहे. गेल्या दीड महिन्यापासून या खतांची टंचाई निर्माण झाली आहे. खताअभावी पिकांची मात्रा रखडल्यामुळे पिकांचे पोषणच थांबल्याचे शेतकरी सांगतात. 
गुजरातमधून नंदुरबार, शहादा येथेही पोटॅश उपलब्ध होत नसल्यामुळे शेतक:यांना नाईलाजाने गोणीमागे अतिरिक्त किंमत देवून आणावे लागत आहे. साहजिकच शेतक:यांचीही प्रचंड आर्थिक लुट होत आहे. वास्तविक खरीप हंगाम सुरू होण्याआधीच येथील कृषी विभागाने सुयोग्य नियोजन करून सर्वच प्रकारच्या रासायनिक खतांची मागणी करणे अपेक्षित होते. मात्र त्यांच्या उदासिन भुमिकेमुळे शेतक:यांना खतांच्या तीव्र टंचाईस सामोर जावे लागत असल्याचा शेतक:यांचा आरोप आहे. आता पिकांना खतांची मात्रा देता आली नाही तर त्यांच्या वाढीबरोबरच पोषण ही थांबले आहे. परिणामी उत्पादनातही मोठी घट होण्याची शक्यता शेतक:यांनी वर्तविली आहे. आधीच पजर्न्यमानाने संकटात सापडलेला शेतकरी अधिक कर्ज बाजारी होणार आहे. निदान जिल्हा प्रशासनाने तरी याप्रकरणी गंभीर दखल घेवून रासायनिक खतांच्या टंचाईचा प्रश्न मार्गी लावावा, अशी शेतक:यांची मागणी आहे.
 

Web Title: Farmers suffer from scarcity of chemical fertilizers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.