शाश्वत शेतीसाठी शेतक:यांनी पुढाकार घ्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2017 12:13 PM2017-08-27T12:13:14+5:302017-08-27T12:13:14+5:30

संकल्प ते सिद्धी उपक्रम : सुभाष भामरे यांचे मेळाव्यात आवाहन

Farmers for sustainable farming should take the initiative | शाश्वत शेतीसाठी शेतक:यांनी पुढाकार घ्यावा

शाश्वत शेतीसाठी शेतक:यांनी पुढाकार घ्यावा

Next
ठळक मुद्दे वेगवेगळे प्रयोग करणा:या शेतक:यांचा सन्मान या वेळी एक एकर शेतीत उत्कृष्ट भाजीपाल्याची फेरपालट करणा:या टेटीबाई पावरा, महाराष्ट्र शासनाचा जिजामाता पुरस्कार प्राप्त सुनिताबाई रावताळे, नचिकेत पुरूष बचत गट प्रमुख ईश्वर गावीत व गांडुळ खत प्रकल्पात उत्कृष्ट काम

लोकमत न्यूज नेटवर्क
लहान शहादा : केंद्र सरकारने शेतक:यांना केंद्रबिंदू मानले आहे. गरीब शेतक:यांचे कल्याण हाच ध्यास आहे. शेतक:यांच्या विकासासाठी विविध योजना असून. या योजनांचा लाभ कृषी विभागाने सामान्य शेतक:यांर्पयत पोहोचवावा व पाच वर्षात शेतीचे उत्पन्न दुप्पटीने वाढवावा असे आवाहन केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे यांनी केले.
कृषी विज्ञान केंद्र, कृषी विभाग व आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने न्यु इंडिया मंथन : संकल्प ते सिद्धी या कार्यक्रमाचे उद्घाटन शनिवारी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.भामरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हा पोलीस अधीक्षक संजय पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मधुकर पन्हाळे, डॉ.हेडगेवार सेवा समिती सचिव डॉ.नितीन पंचभाई, कृषी सल्लागार संतोष सहाणे, डॉ.हेडगेवार सेवा समिती अध्यक्ष कृष्णदास पाटील, उपाध्यक्ष रवी बेलपाठक, भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विजय चौधरी आदी उपस्थित होते.
केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.भामरे म्हणाले, जिल्ह्यातील शेतकरी अतिशय कष्टाळू आहेत. काम करण्याची त्यांच्यात ताकद आहे.  वीज, पाणी, शेतमालाला योग्य भाव आणि शेतीला पूरक जोड व्यवसाय केला तर येथील शेतकरी प्रगती करू शकेल. या पाश्र्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शेतकरी विकासासाठी विविध योजना जाहीर केल्या आहेत. या योजना कृषी विज्ञान केंद्र व कृषी विभागाने प्रत्येक गावातील प्रत्येक शेतक:यांर्पयत पोहोचविल्या पाहिजेत.  जमिनीच्या आरोग्य पत्रिका तयार करून घ्यावी. शास्त्रोक्त व आधुनिक पद्धतीने शेती करीत शेतक:यांनी प्रगती साधावी. तसेच आगामी काळात कोल्ड स्टोरेज आणण्यासाठी आपले प्रय} राहतील. त्यामुळे कांद्यासारखा शेतमाल तेथे ठेवता येईल आणि योग्य दर मिळाल्यावर शेतकरी त्याची विक्री करू शकेल.
जिल्हाधिकारी डॉ.कलशेट्टी म्हणाले की, आपल्या देशाला 2012 मध्ये स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण होणार आहेत. त्यामुळे आपला देश बलशाली झाला पाहिजे, गरीबीमुक्त कुपोषणमुक्त झाला पाहिजे, सर्वाचे आरोग्य चांगले राहिले पाहिजे, प्रति कुटुंब उत्पन्न वाढले पाहिजे म्हणून नव्या भारताचे संकल्प आपण याठिकाणी करत आहोत. दारिद्रय़रेषेखालील घटकांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासनाच्या विविध योजना आहेत. त्याचा लाभ घेतला पाहिजे. शेतक:यांनी   पाण्याचा काटेकोर वापर करून गटशेतीवर जास्तभर दिला पाहिजे. तसेच पीक विमा योजनेत शेतकरी सहभागी झाली पाहिजेत. तसेच पीक विमा योजनेत शेतकरी सहभागी झाले पाहिजेत.
प्रास्ताविक हेडगेवार सेवा समितीचे सचिव डॉ.पंचभाई यांनी केले. कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख राजेंद्र दहातोंडे यांनी कृषी विज्ञान केंद्रामार्फत करण्यात येणा:या विविध कामकाजाची माहिती दिली. सूत्रसंचालन कृषी विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञ आर.एम. पाटील यांनी तर आभार विषय विशेषज्ञ यु.डी. पाटील यांनी मानले. यावेळी जिल्हाभरातील शेतकरी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
 

Web Title: Farmers for sustainable farming should take the initiative

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.