खेडा खरेदीत शेतक:यांची लूटमार सुरुच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2019 12:44 PM2019-12-02T12:44:24+5:302019-12-02T12:48:46+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : खेडा कापूस खरेदीत व्यापारी शेतक:यांना नाडत असून अवघा 4700 ते 4900 रुपये क्विंटल भाव ...

Farmers in village shopping: Their plunder begins | खेडा खरेदीत शेतक:यांची लूटमार सुरुच

खेडा खरेदीत शेतक:यांची लूटमार सुरुच

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : खेडा कापूस खरेदीत व्यापारी शेतक:यांना नाडत असून अवघा 4700 ते 4900 रुपये क्विंटल भाव देत आहे. याशिवाय मोजणीची पद्धतही सदोष राहत असल्यामुळे शेतक:यांचे मोठे नुकसान होत आहे. दुसरीकडे  बाजार समितीतर्फे सुरू करण्यात आलेल्या खरेदी केंद्राकडे देखील शेतकरी वळू लागले आहेत. येथे भाव 5100 ते 5400 र्पयत मिळत आहे. शिवाय थेट बँक खात्यात रक्कम जमा होत असल्यामुळे शेतक:यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. 
कापूस खरेदीला सध्या ग्रामीण भागात जोर आला आहे. वातावरणातील आद्रता कमी झाली आहे. जो कापूस पावसात ओला झाला होता तो आता सुकविला गेला आहे. त्यामुळे कापसातील ओलावा ही खरेदीदारांकडून होणारी ओरड कमी झाली आहे. परिणामी शेतक:यांच्या कापसाला आता ब:यापैकी भाव मिळू लागला आहे. परंतु अनेक शेतकरी हे खेडा खरेदीला प्राधान्य देत असल्यामुळे शेतकरी त्यात नाडला जात आहे. त्यामुळे बाजार समितीच्या कापूस खरेदी केंद्रास आणि सीसीआयच्या खरेदी केंद्राला पसंती दिली जात आहे. 
खेडा खरेदीत लुटमार
जिल्ह्यात यंदा कापसाचे क्षेत्र जवळपास एक लाख हेक्टर्पयत होते. परंतु सततचा पाऊस, काही वेळा अतिवृष्टी यामुळे कापूस पिकाला फटका बसला. जेमतेम जे उत्पादन हाती येत होते त्यातही अवकाळी पावसाने कापूस खराब केला. परिणामी कापूस उत्पादन यंदा घटले आहे. असे असले तरी ज्या शेतक:यांना योग्य नियोजन करून कापूस पीक घेतले त्यांना चांगले उत्पादन आले आहे. सध्या कापूस विक्री जोमाने सुरू आहे. मात्र काही शेतकरी नंदुरबारातील खरेदी केंद्रात येण्यास कंटाळा करून गावात येणा:या कापूस व्यापा:यालाच तो विक्री करीत असल्याचे चित्र आहे. खेडा खरेदीतील व्यापारी मात्र अतिशय कमी भाव देत आहेत. खरेदी केंद्राच्या तुलनेत कमी भाव मिळूनही शेतकरी वाहतुकीचा ताण नको आणि लिलावाची प्रतिक्षा नको म्हणून स्थानिक स्तरावरच आलेल्या व्यापा:यांना कापूस विक्री करून मोकळे होत आहेत. परंतु त्यात शेतकरी नाडला जात असल्याचे दिसून येत आहे.
बाजार समिती व सीसीआय
बाजार समितीच्या खरेदी केंद्रात सध्या चांगली आवक होत आहे. सीसीआयने देखील जोमाने कापूस खरेदी सुरू केली आहे. कापसातील ओलाव्याच्या कारणावरून शेतक:यांनी या केंद्राकडे पाठ फिरविली होती. परंतु आता ओलावा कमी झाल्याने आता सीसीआयने देखील काही बाबी शिथील केल्याने शेतक:यांचा प्रतिसाद वाढत आहे. या ठिकाणी 5100 ते 5400 रुपये क्विंटल कापूस भाव मिळत आहे. 
थेट बँकेत पैसे जमा
खरेदी केंद्रात कापूस विक्री केल्यानंतर थेट शेतक:यांच्या खात्यात पैसे जमा केले जात आहे. त्यामुळे पैशांची सुरक्षितता देखील असते. कापूस विक्रीला आणतांना शेतक:यांनी सातबारा उतारा, आधार कार्ड आणि बँक पासबूक यांची ङोरॉक्स आणल्यावर शेतक:यांच्या कापसाची लागलीच मोजमाप होऊन प्रतवारीनुसार भाव दिला जात असल्याचे बाजार समितीचे सचिव योगेश अमृतकर यांनी सांगितले.
 

Web Title: Farmers in village shopping: Their plunder begins

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.