तळोद्यात ऊस जाळण्याच्या सत्राने शेतकरी चिंतेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2018 12:48 PM2018-10-14T12:48:53+5:302018-10-14T12:48:58+5:30
तळोदा तालुका : शेतक:यांचे नुकसान, प्रशासनाने दखल घ्यावी
बोरद : तळोदा तालुक्यातील पूर्व भागात गेल्या अनेक दिवसांपासून ऊस जाळण्याचे सत्र सुरु आह़े यामुळे येथील ऊस उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत़ गेल्या दोन आठवडय़ात ऊस जाळण्याच्या चार ते पाच घटना आतार्पयत झालेल्या आहेत़ त्यामुळे शेतक:यांच्या तोंडाचे पाणी पळाले असल्याचे दिसून येत आह़े
शुक्रवारी सायंकाळी मोहिदा येथील ऊस उत्पादक शेतकरी शरद खंडू चव्हाण व त्यांची पत्नी शिलाबाई चव्हाण याच्या उमरी शिवारातील 91/1 व 91/2 या शिवारात एकूण साडेसात एकरावर उसाचे पिक घेण्यात आले आह़े त्यातील साधारणत: 3 एकरावरील ऊस जळून खाक झाला आह़े उमरी आणि मोहिदा येथील शेतकरी तसेच युवकांनी लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केल़े परंतु आग सर्वत्र पसरली असल्याने तीला आटोक्यात आणणे शक्य झाले नाही़ ही आग हेतूपुरस्कर कोणीतरी लावली असल्याचा आरोप चव्हाण कुटुंबियांकडून करण्यात येत आह़े याच शिवारामध्ये या आधीही उसाच्या क्षेत्राला आग लागल्याची घटना घडली आह़े त्यामुळे साहजिकच ही आगदेखील विघ्नसंतोषी वृत्तीच्या लोकांकडूनच लावण्यात आली असल्याचे म्हटले जात आह़े
दुसरीकडे 11 ऑक्टोबर रोजी तळोदा ते बोरद रस्त्यावरील कढेल शिवारातील रामदास फकीरा शिंदे यांच्या शेतातून शेती उपयोगी साहित्येही चोरीला गेल्याची घटना ताजी आह़े याबाबत महावितरणचे उपकार्यकारी अभियंता सचिन काळे यांनाही घटनेची माहिती देण्यात आली होती़ एकीकडे उसाला आग लावण्याच्या घटना तर दुसरीकडे अशा प्रकारे शेती उपयोगी साहित्यांची चोरी होण्याच्या घटना वाढत आहेत़ यामुळे शेतक:यांचे निव्वळ नुकसान होत आह़े त्यामुळे तालुक्यात कायदा व सुव्यवस्था आहे की नाही ? असा प्रश्न शेतक:यांकडून विचारण्यात येत आह़े
कापूसही जातोय चोरीला
सध्या शेतशिवारात कापूस वेचनीची कामे जोमात सुरु आहेत़ कापूस वेचून तो एका ठिकाणी गोळा करण्यात येत आह़े परंतु रात्री कापसाची चोरी होत असल्याच्या घटना उघडकीस येत आह़े त्यामुळे कापूस उत्पादक शेतक:यांना रात्रीदेखील खडा पहारा ठेवावा लागत असल्याचे सांगण्यात येत आह़े दिवसभर शेतात राबून घामाने उगवलेले पिकही चोरीला जात असल्याने शेतकरी हतबल झाला आह़े त्यामुळे संबंधित प्रशासनाने याकडे लक्ष देत तातडीने उपाय योजना राबवाव्या अशी मागणी शेतकरी करीत आहेत़