हळदीवरील बुरशीजन्य आजारामुळे शेतकरी चिंतेत

By admin | Published: January 16, 2017 01:11 AM2017-01-16T01:11:26+5:302017-01-16T01:11:26+5:30

हळद कोरडी पडून तिला बुरशीजन्य रोगाची लागण झाल्याने शेतक:यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आह़े

Farmers worry because of the low fungal disease | हळदीवरील बुरशीजन्य आजारामुळे शेतकरी चिंतेत

हळदीवरील बुरशीजन्य आजारामुळे शेतकरी चिंतेत

Next


लहान शहादे : नंदुरबार तालुक्यातील लहान शहादे, खोळसगाव व पळाशी येथे काही शेतांमध्ये लावण्यात आलेली हळद कोरडी पडून तिला बुरशीजन्य रोगाची लागण झाल्याने शेतक:यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आह़े
परिसरात लावण्यात आलेली हळद अचानक सुकायला लागली यामुळे याचा विपरित परिणाम हा उत्पादनावर होणार असल्याने शेतकरी घाबरले आहेत़ शेतक:यांनी याबाबत कृषी विभागाला माहिती दिल्यावर  विभागातर्फे पिकांची पाहणी करण्यात आली आह़े
दरम्यान, रोगामुळे हळदीची गुणवत्ता कमी होणर असल्याची माहिती परिसरातील शेतक:यांकडून देण्यात आली आह़े यामुळे सुमारे 20 टक्के उत्पादनात घट होणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आह़े कृषी विभागाकडून हळदीची पाहणी करण्यात आली असून रोगाची माहिती घेण्यात येत आह़े तसेच रोगाची साथ लगतच्या पिकांवर येऊ नये यासाठी पिकावर फवारणी करण्याचे काम करण्यात येत आह़े उत्पन्नात घट होणार असल्याने शेतकरी मात्र यामुळे चिंतेत सापडला आह़े
    (वार्ताहर)

Web Title: Farmers worry because of the low fungal disease

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.