पाणी पातळी खालावल्याने शेतकरी चिंतेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2018 01:13 PM2018-10-29T13:13:53+5:302018-10-29T13:13:57+5:30

तळोदा तालुका : नवीन कुपनलिका खोदण्यासाठी शेतक:यांची धांदल

Farmers worry because of water level dropout | पाणी पातळी खालावल्याने शेतकरी चिंतेत

पाणी पातळी खालावल्याने शेतकरी चिंतेत

Next

तळोदा : कमी पजर्न्यमानामुळे दिवसेंदिवस भूगर्भातील पाण्याची पातळी प्रचंड खालावत असल्याने तालुक्यातील शेतक:यांचे बोअर आटत आहेत. साहजिकच शेतक:यांपुढे पीक वाचविण्याचा प्रश्न निर्माण झाला असून, नाईलाजास्तव शेतक:यांना बोअर करावा लागत आहे. सद्या बोअर करणा:या शेतक:यांची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढल्यामुळे बोअर व्यावसायिकांचा धंदादेखील तेजीत आला आहे. दरम्यान 70 ते 80 फुटावरील पाण्याची पातळी 200 फुटा पेक्षा अधिक खोलवर गेल्याचे शेतकरी सांगतात.
गेल्या पाच वर्षापासून तळोदा तालुक्यातील पजर्न्यमान सातत्याने घटत आहे. यंदा तर सरासरीच्या 50 टक्केदेखील पाऊस झाला नाही. एवढेच नव्हे तर मुसळधार पावसाअभावी नदी, नाले पुराने वाहून निघाली नाही. शिवाय धरणांच्या जलसाठाही वाढला नाही. परिणामी सिंचन प्रकल्पांवर अवलंबून असणारी शेतक:यांची कृषी पंपाची पातळीही वाढली नाही. आता तर हिवाळ्यापासूनच भूगर्भातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस खोलवर जात असल्याने शेतक:यांचे कृषी पंप निकामी होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यातच ऊस, केळी, पपई, कापूस ही पिके पाण्याअभावी करपू लागल्यामुळे शेतक:यांपुढे पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पंपातून अत्यल्प पाणी येत असल्याने शेतकरी वर्ग बोअरमध्ये पाईप उतरवून अक्षरश: हैराण झाला आहे. तरीही उपयोग होत नसल्यामुळे नाईलाजास्तव त्यास दुसरा बोअर करावा लागत आहे.
शेतात बोअर करणा:या शेतक:यांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढत आहे. साहजिकच टय़ुबवेल व्यावसायिकांचा धंदा तेजीत आला आहे. तरीही लवकर नंबर लागत नसल्याची व्यथा शेतक:यांनी बोलून दाखविली आहे.  1972 नंतर प्रथमच तालुक्यात भीषण दुष्काळाची परिस्थिती उद्भवली असल्याची स्थिती जुने जानकार मंडळी सांगत आहेत. कारण अगदी 70 ते 80 फुटावरच भूगर्भातील पाण्याची पातळी होती. आता पाण्याची पातळी तब्बल 200 फुटापेक्षा अधिक खोलवर गेली आहे. तशी वस्तुस्थितीही शेतात बोअरींगचे काम करणा:या एका मजुराने सांगितली. एका शेतक:याने तर तब्बल चार बोअर केले. मात्र ते सर्व फेल झालेत. आता पुन्हा नवीन बोअरचे काम सुरू आहे. शेतातील केळी, उसाचे पीक पाण्याअभावी करपू लागल्यामुळे नाईलाजास्तव प्रचंड खर्च करून नवीन बोअर करावा लागत आहे. आता पाण्यासाठी दैवावर विश्वास आहे, अशी हताश भावना या शेतक:याने व्यक्त केली होती. आधीच पुरेशा पावसाअभावी शेतक:यांच्या खरीप पिकांच्या उत्पादनात प्रचंड घट झाली असून, उत्पादन खर्चही निघणे मुश्किल झाले आहे. आता शेतातील बोअर आटत आहे. त्यामुळे शेतक:यांना मोठय़ा आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. शासनाने दृष्काळी सुविधांची तातडीने अंमल बजावणी करावी, अशी शेतक:यांची मागणी आहे.
 

Web Title: Farmers worry because of water level dropout

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.