वरखेडी नदीवरचा जीर्ण पूल कोसळण्याची भिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2020 12:21 PM2020-01-10T12:21:04+5:302020-01-10T12:21:16+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अक्कलकुवा : शहरातून जाणाऱ्या बºहाणपूर-अंकलेश्वर मार्गावरील वरखेडी नदीच्या पुलाची दयनीय अवस्था झाली आहे़ पुलावरच्या खड्ड्यांमुळे दरदिवशी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
अक्कलकुवा : शहरातून जाणाऱ्या बºहाणपूर-अंकलेश्वर मार्गावरील वरखेडी नदीच्या पुलाची दयनीय अवस्था झाली आहे़ पुलावरच्या खड्ड्यांमुळे दरदिवशी वाहतूक कोंडी होत असून यातून वाहतूकीचा खोळंबा होत आहे़ दिवसेंदिवस जीर्ण होणारा पूल कोसळण्याची भिती व्यक्त होत आहे़
महामार्गावर महाराष्ट्र व गुजरात राज्याला जोडणारा वरखेडी नदीवरील पुलावर मोठे खड्डे पडले आहेत़ या पुलावरील कठडेदेखील गेल्या पावसाळ्यात वरखेडी नदीला आलेल्या महापुरात वाहून गेले आहेत़ गेल्या दोन वर्षात पुलाची कोणत्याही प्रकारे दुरुस्तीच झालेली नसल्याने मोठे खड्डे पडून पुलाची स्थिती आणखी बिकट झाली आहे़ पुलावर नेहमीच अवजड वाहने बिघडत असल्याने त्यामुळे चार तासांपर्यंत वाहतूक कोंंडीची स्थिती नागरिकांना अनुभवण्यास येत आहे़
सार्वजनिक बांधकाम विभागाचे रस्त्याचे खड्डे बुजवण्यासाठी संबंधित विभाग केवळ मुरूम टाकण्याची कारवाई करत आहे़ यातून रस्त्यावर डांबरीकरणाऐवजी मुरुमाचा फुफाटा सध्या नागरिकांसाठी जीवघेणा ठरत आहे़ जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा महामार्गावरच्या पुलाची दुरुस्ती करण्याबाबत संबधित विभागाने घेतलेल्या उदासिन भूमिकेचा फटका सर्वच वाहनधारकांना होत असून यातून सुटका कधी होणार असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे़