पहिल्या दिवशी ग्राहकांच्या चेहऱ्यावर कोरोनाची भिती..!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2020 11:44 AM2020-10-06T11:44:18+5:302020-10-06T11:44:24+5:30
मनोज शेलार । लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : हॉटेल, बार, रेस्टॉरंट व्यवसायाला सोमवार, ५ आॅक्टोबरपासून परवाणगी मिळाली असली तरी ...
मनोज शेलार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : हॉटेल, बार, रेस्टॉरंट व्यवसायाला सोमवार, ५ आॅक्टोबरपासून परवाणगी मिळाली असली तरी विविध अटी आणि नियमांमुळे मात्र पहिल्या दिवशी ग्राहक फिरकले नसल्याची स्थिती आहे. व्यावसायिकांमध्येही सायंकाळी सात वाजेपर्यंतच्या वेळेबाबत नाराजी आहे. दरम्यान, हॉटेल व्यावसायीकांनी कोरोनाच्या पार्श्वभुमीवर विविध उपाययोजना केल्याचे दिसून आले.
गेल्या सहा महिन्यानंतर प्रथमच हॉटेल, बार, रेस्टॉरंट सुरू झाले. कोविडच्या पार्श्वभुमीवर क्षमतेपेक्षा निम्मे ग्राहकांना प्रवेश देण्यात आले. अनेक हॉटेल चालकांनी दोन टेबलमध्ये अंतर ठेवणे, प्रवेशद्वारावर हॅण्ड सॅनिटायझर, थर्मल स्कॅनरची सोय केल्याचे दिसून आले. काही ठिकाणी विशेषत: बार असलेल्या ठिकाणी मात्र थर्मल स्कॅनर नसल्याचे चित्र होते. वेटर आणि कप्टन यांना सुरक्षेच्या दृष्टीने विविध साधने उपलब्ध करून देण्यात आली आहे. किचनचीही रचना काही हॉटेलचालकांनी बदललेली दिसून आली. पहिल्या दिवशी मात्र ग्राहकांचा अपेक्षीत प्रतिसाद मिळाला नसल्याचे हॉटेल चालकांनी सांगितले.
अशी घेतली जाते दक्षता : सर्वच वेटर व कॅप्टन यांना हेडकॅप, मास्क, हॅण्डग्लोव्हज् पुरविण्यात येत आहे. ग्राहकांशी संवाद साधतांना ठराविक अंतर पाळावे, वारंवार वस्तूंना हात लागू नये याची दक्षता.
प्रवेशद्वारासह आतमध्ये ठिकठिकाणी सॅनिटायझर उपलब्ध आहेत. डिश शक्यतो वापरा आणि फेका या स्वरूपातील वापरावर भर देण्यात येत आहे.