नवापूर तालुक्यातही अंगणवाडी केंद्रात ‘बुरशी’युक्त शेवया

By admin | Published: June 28, 2017 12:46 PM2017-06-28T12:46:47+5:302017-06-28T12:46:47+5:30

नंदुरबार जि़प़च्या माजी अध्यक्षांची तक्रार

Fenugreek-bound Chevaya at Anganwadi center in Navapur taluka | नवापूर तालुक्यातही अंगणवाडी केंद्रात ‘बुरशी’युक्त शेवया

नवापूर तालुक्यातही अंगणवाडी केंद्रात ‘बुरशी’युक्त शेवया

Next

 ऑनलाईन लोकमत 

नवापूर,दि.28- तालुक्यातील बोकळझर येथील अंगणवाडी केंद्रात पुरवण्यात आलेल्या पौष्टिक आहारात बुरशीयुक्त शेवया आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आह़े ही बाब गंभीर असून पुरवठादार संस्थेची चौकशी करून त्यात संस्थेवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष भरत गावीत यांनी केली आह़े 
महाराष्ट्र शासनामार्फत सहा महिने ते तीन वर्षे वयोगटातील बालकांना पौष्टिक आहार दिला जातो़ गरीब आदिवासी मुले हे कुपोषित राहणार नाहीत़ त्यासाठी शासनाची योजना सुरू आह़े परंतू नवापूर तालुक्यात घडलेल्या या प्रकारामुळे आदिवासी बालकांना कुपोषण मुक्त करावयाचे आहे की त्यांचे आरोग्य बिघडवयाचे आहे असा, सवाल केला जात आह़े हा प्रकार बोळकझर येथील सरपंच राहुल गावीत यांनी उघकीस आणला असून या प्रकारामुळे संपूर्ण तालुक्यात संताप व्यक्त करण्यात येत आह़े या प्रकरणी आज माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भरत गावीत व शिष्टमंडळाने गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर यांची भेट घेत या प्रकरणी लक्ष घालण्याची मागणी केली़ 
 

Web Title: Fenugreek-bound Chevaya at Anganwadi center in Navapur taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.