खतांनी भरलेला ट्रक उलटला : अक्कलकुवा जवळील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2018 12:25 PM2018-02-10T12:25:53+5:302018-02-10T12:25:57+5:30

Fertilizer truck overturns: events near Akkalkuwa | खतांनी भरलेला ट्रक उलटला : अक्कलकुवा जवळील घटना

खतांनी भरलेला ट्रक उलटला : अक्कलकुवा जवळील घटना

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
कोठार : अंकलेश्वर-ब:हाणपुर राज्य मार्गावरील अक्कलकुव्याजवळ खतांनी भरलेला ट्रक भरधाव वेगामुळे उलटला.सुदैवाने या अपघातात कोणतीही जिवीत हानी झाली नाही. परंतु यामुळे अवजड वाहतुकीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आह़े ही घटना गुरुवारी रात्री 12 वाजेच्या सुमारास घडली.
याबाबत सविस्तर माहिती असे की, खतांनी भरलेला ट्रक (क्रमांक जी.ज़े 5 ङोड़ 8833) हा शहाद्याहून खताच्या गोण्या भरून गुजरात राज्यात जाण्यासाठी निघाला होता. हा ट्रक अंकलेश्वर-ब:हाणपुर  राज्यमार्गावरील अक्कलकुवा शहराबाहेरील एका हॉटेल नजीकच्या वळणार आला असता भरधाव              वेगात असल्याने ट्रक चालकाचे नियंत्रण सुटून रस्त्याच्या कडेला उतरला. अनियंत्रित वेगामुळे  वळणाचा अंदाज चुकल्याने हा ट्रक रस्त्यावरून खाली उतरला व           रस्त्याच्या कडेला  असणा:या खड्डयात जाऊन आदळला. भरधाव वेग असल्याने खड्डयात आदळलेला ट्रक पलटी  झाला. हा अपघात एवढा भीषण  होता की, रस्त्याच्या             कडेवरून उतरलेला हा ट्रक  आदळला जाऊन अक्षरश: चित्रपटातील दृष्यांमध्ये शोभावा अशा पध्दतीने पलटी झाल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. 
ट्रकचे चारही चाके वरच्या दिशेला झाली असून ट्रक मधील खताच्या गोण्या  ट्रक खालीच दाबल्या गेल्या. या ट्रकमध्ये चालक व सहचालक यांच्यासह अजून दोन ते तीन जण बसले असल्याची माहिती देण्याचे आली आली. या भीषण अपघातात ते बचावले असून त्यांना किरकोळ जखमा झाल्या आहेत़ 
अंकलेश्वर-ब:हाणपुर राज्यमार्गावर दिवस-रात्र मोठय़ा संख्येने वाहनांची वर्दळ असते. वाहनांची वाढलेली वर्दळ व दळणवळणाच्या दृष्टीने या मार्गाची उपयुक्तता लक्षात घेता राज्यमार्गावरील तळोदा ते अंकलेश्वर र्पयतचा रस्ता हा शेवाळी-नेत्रंग या राष्ट्रीय महामार्गात समाविष्ट करण्यात आला आहे. 
राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळून सुमारे दीड वर्षांचा कालावधी उलटला असला तरी या मार्गावर सुरक्षेच्या कोणत्याही उपाययोजना झाल्या नसल्याचे दिसून येते. दर दिवसाआड राज्य मार्गावरील तळोदा ते  खापर दरम्यान वाहने पलटी  होण्याचे प्रकार घडून येतात. भरधाव वेगाने धावणारी अनियंत्रित व ओव्हरलोड वाहने ही त्यामाग प्रमुख कारणे असल्याचे बोलले जाते.
 

Web Title: Fertilizer truck overturns: events near Akkalkuwa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.