वन्यप्राण्यांपेक्षा अफवांच्या बाजाराने ग्रामीण भागात भिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2018 12:45 PM2018-12-15T12:45:19+5:302018-12-15T12:45:23+5:30
नंदुरबार : दुष्काळाने होरपळ सुरु असलेल्या नंदुरबार तालुक्याच्या पूर्व भागात ग्रामस्थांना हिंस्त्र प्राणी गाव शिवारात फिरत असल्याचे निरोप मिळत ...
नंदुरबार : दुष्काळाने होरपळ सुरु असलेल्या नंदुरबार तालुक्याच्या पूर्व भागात ग्रामस्थांना हिंस्त्र प्राणी गाव शिवारात फिरत असल्याचे निरोप मिळत आहेत़ यातून भिती निर्माण होऊन शेतशिवारात शिल्लक असलेली कामेही होत नसल्याने संकट अधिक गडद होत आह़े
मांजरे येथे गेल्या 15 दिवसांपूर्वी शेळी आणि गाय ठार करत बिबटय़ाने अस्तित्व दर्शवून दिले होत़े यानंतर वनविभागाने पंचनामा करत गस्तही सुरु केली होती़ या प्रकारानंतर वनविभाग गस्त करत असताना कोपर्ली, मांजरे, खोंडामळी, आराळे, शनिमांडळ, रनाळे, वडबारे, निंभेल, रजाळे, बलवंड, सैताणे आणि आखातवाडे या भागात वन्यप्राणी फिरत असल्याच्या अफवांना पेव फुटले आह़े सायंकाळी शेतशिवारात हिंस्त्र प्राणी पाहिले गेल्याचे दावे केले गेल्याने शेतक:यांमध्ये भिती निर्माण झाली आह़े यामुळे नंदुरबार वनविभागाची एकच धावपळ सुरु असून वनविभागाचे कर्मचारी संपूर्ण तालुका पिंजून काढत आहेत़ गेल्या तीन दिवसात पूर्व भागातील गावांमध्ये तरसाचे झुंड फिरत असल्याची माहिती दिली गेल्यानंतर सहा जणांच्या गस्तीपथकाने फेरी करुनही त्यांच्या हाती काहीच लागले नाही़ हीच स्थिती तालुक्याच्या तापीकाठालगत असलेल्या गावशिवारात आह़े सातत्याने वाढत असलेल्या अफवांमुळे शेतशिवारातील कांदाचाळींचे सरंक्षण करण्यासाठी रखवालदार आणि तुरळक प्रमाणातील रब्बी शेतीकामांसाठी मजूर मिळत नसल्याचे शेतक:यांकडून सांगण्यात येत आह़े या भागात साधारण रब्बी ज्वारी पेरणीसह कांदा बियाणे तयार करण्याची कामे करण्यात येत आहेत़ परंतू वन्यप्राण्याचा संचार असल्याच्या अफवेने ही कामे करण्यासाठी मजूर मिळत नसल्याचे चित्र आह़े दरम्यान अफवा वाढू नये यासाठी वनविभागाचे सहायक वनसंरक्षक जी़आऱरणदिवे, वनपरिक्षेत्र अधिकारी मनोज रघुवंशी यांनी कोपर्ली येथे भेट देत ग्रामपंचायतीत बैठक घेतली़ यावेळी दोन्ही अधिका:यांनी येथील नागरिकांसोबत संवाद साधून बिबटय़ा किंवा इतर वन्य प्राणी दिसल्यास करावयाच्या उपाययोजनांची माहिती देत अफवांवर विश्वास न ठेवण्याचे सांगितल़े येत्या काळात प्राण्यांचा संचार सुरु होण्याची भिती यावेळी काही ग्रामस्थांनी बोलून दाखवली होती़ नंदुरबार तालुक्यातील शनिमांडळ, ठाणेपाडा, पावला, आंबेबारा, धनीबारा, वावद, वासदरा लघुप्रकल्पाच्या जवळपास असलेल्या विविध गावांमध्ये वन्यप्राणी फिरत असल्याचा दावा करण्यात आला होता़ ग्रामस्थांकडून सायंकाळनंतर वन्यप्राणी पाहिल्याची माहिती दिल्यानंतर गस्तीला सुरुवात करण्यात आली आह़े तालुक्यात तरस आणि बिबटय़ाचा संचार असल्याचे सांगण्यात येत असले तरी तालुक्यात केवळ एकाच ठिकाणी बिबटय़ा दिसून आल्याची माहिती आह़े शनिमांडळ परिसरातील लघुप्रकल्प कोरडे झाल्याने या भागात वन्यप्राणी फिरत असल्याच्या निव्वळ अफवा असल्याचे वनविभागाचे म्हणणे आह़े