नंदुरबारात विवाहितांच्या छळ प्रकरणी गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2018 01:02 PM2018-03-05T13:02:25+5:302018-03-05T13:02:25+5:30

वेगवेगळ्या घटना : मान-पान केला नाही म्हणून सासरच्यांचा जाच

Filing a complaint in the case of marital infidelity in Nandurbar | नंदुरबारात विवाहितांच्या छळ प्रकरणी गुन्हा दाखल

नंदुरबारात विवाहितांच्या छळ प्रकरणी गुन्हा दाखल

Next


लोकमत ऑनलाईन
नंदुरबार, दि़ 5 :लगआत मानमरातब केला नाही, म्हणून शहरात दोन विवाहितांचा छळ झाला़ वेगवेगळ्या भागात घडलेल्या या घटनांची पोलीसात नोंद झाली आह़े
गांधीनगर
शहरातील सहारा टाऊन देवचंद नगर येथील रहिवासी अर्चनाबाई वाघ यांचा पती जयवंत रामभाऊ वाघ, सासू वंदनाबाई रामभाऊ वाघ, नणंद प्रतिभा दत्तात्रय पाटील रा़ फाफारे ता़ अमळनेर, सिमा मच्छिंद्र पाटील, मनिषा संदीप पाटील दोन्ही रा़ उधना ता़जि़सुरत यांनी ऑगस्ट 2014 ते ऑक्टोबर 2017 या काळात आई-वडीलांनी लगआत मुळाचे भांडे, फर्निचर, टीव्ही फ्रीज आणून दिले नाहीत, याचा राग धरून शारिरिक व मानसिक छळ केला़ तसेच अर्चनाबाई यांच्या अंगावरील चार तोळे सोन्याची पोत व सात ग्रॅम वजनाचे कानातील सोन्याचे दागिने काढून घेत शिवीगाळ करून जिवे ठार मारण्याची धमकी दिली़ याबाबत अर्चनाबाई वाघ यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात पती, सासू व तिन्ही नणंद यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल वळवी करत आहेत़
गुरूकुल नगर
होळ शिवारातील गुरूकुल नगरातील सासर व आयटीआय कॉलनी शनिमंदीर रोड येथील माहेर असलेल्या मनिषा बैसाणे यांनी माहेरून एलसीडी घेण्यासाठी एक लाख रूपये आणावेत, तसेच लगआत मानपान दिला नाही, याचा राग धरून पती सचिन रविंद्र बैसाणे, सासू मंगलाबाई रविंद्र बैसाणे, सासरे रविंद्र बिसन बैसाणे, दीर सागर रविंद्र बैसाणे व नणंद मोहिनी दिपक बढे यांनी मे 2017 ते जानेवारी 2018 या काळात छळ केला़ विविहिता मनिषा यांनी माहेरून पैसे आणण्यासाठी सासरच्यांकडून तगादा लावत असतानाच काळ्या रंगावरून अवहेलना करत शारिरिक व मानसिक छळ केला़ दरम्यान पती सचिन बैसाणे याने मनिषा यांना घराबाहेर काढूून त्यांच्या अंगावरील स्त्रीधन काढून घेत जीव ठार मारण्याची धमकी दिली़ याबाबत मनिषा बैसाणे यांनी शनिवारी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या खबरीवरून सर्व संशयित आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े
तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल कुवर करत आहेत़

Web Title: Filing a complaint in the case of marital infidelity in Nandurbar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.