नंदुरबार जिल्हा परिषदेत बदल्यांसाठी अनेकांची फिल्डींग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2018 12:41 PM2018-05-06T12:41:53+5:302018-05-06T12:41:53+5:30

निवडणुकीच्या वर्षामुळे पदाधिका:यांचीही होतेय कसरत

Filing of many for transfer to Nandurbar Zilla Parishad | नंदुरबार जिल्हा परिषदेत बदल्यांसाठी अनेकांची फिल्डींग

नंदुरबार जिल्हा परिषदेत बदल्यांसाठी अनेकांची फिल्डींग

googlenewsNext

लोकमत ऑनलाईन
नंदुरबार, दि़ 6 : जिल्हा परिषदेअंतर्गत होणा:या बदल्यांसाठी अनेकांनी फिल्डींग लावून ठेवली आहे. दरवर्षाप्रमाणे यंदाही समुपदेशन शिबिराद्वारे तसेच संपुर्ण व्हिडीओ चित्रीकरणाद्वारेच करण्यात येणार आहेत. त्यासाठी 23 ते 25 या तीन दिवसात हे शिबिर होईल. पंचायत समिती स्तरावर 28 ते 30 दरम्यान शिबिर घेण्यात येणार आहे. दरम्यान, यंदा शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्या होणार असल्यामुळे जिल्हा परिषदेचा मोठा ताण मिटला आहे. 
मे महिन्यात जिल्हा परिषद, महसूल, पोलीस यासह इतर विभागांच्या बदल्यांची प्रक्रिया राबविण्यात येते त्यासाठी एप्रिल महिन्यापासूनच प्राथमिक प्रक्रियेला सुरूवात होत असते. जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन   विभागाने बदल्यांचा सर्व डाटा तयार केला असून केवळ समुपदेशनाद्वारे आता प्रक्रिया राबविण्याचे बाकी आहे.
निवडणुकीचे वर्ष
यंदा जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचे वर्ष असल्यामुळे पदाधिकारी, सदस्य आणि कार्यकत्र्याची मर्जी सांभाळण्यासाठी गेल्या दोन महिन्यांपासूनच अनेकांकडून दबावतंत्र सुरू झाले आहे. जिल्हा परिषद पदाधिकारी आणि नेत्यांना देखील आपल्या परिसरातील कार्यकत्र्याची मने सांभाळण्यासाठी आश्वासने द्यावी लागत आहेत. 
परंतु बदली प्रक्रिया ऑनलाईन आणि समुपदेशनासह थेट व्हिडीओ चित्रीकरणाच्या माध्यमातून होणार असल्यामुळे वशिला आणि   शिफारस, शिफारस पत्र यासह इतर माध्यमातून येणा:या दबाव यांना फारसे महत्त्व राहणार नाही हे स्पष्टच आहे.
20 टक्के बदल्या होणार
प्रत्येक विभागाच्या एकुण कर्मचारी संख्येच्या 20 टक्के बदल्या करण्यात येणार आहेत. त्यात 10 टक्के या प्रशासकीय तर 10 टक्के या विनंती बदल्या राहणार आहेत. तीच पद्धत पंचायत समिती स्तरावर देखील राबविण्यात येणार आहे. 
विनंती बदल्यांमध्ये अपंग, दुर्धर आजार, पती-प}ी एकत्रीकरण यांना प्राधान्य राहणार आहे. प्रशासकीय बदल्यांमध्ये एका ठिकाणी तीन वर्षापेक्षा अधीक काळ असलेल्या कर्मचा:यांचा समावेश राहणार     आहे. 
शिक्षकांचा ताण मिटला
यंदा शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्या होणार असल्यामुळे जिल्हा परिषदेचा मोठा ताण मिटला आहे. बदलीच्या समुपदेशन शिबिरात किमान तीन दिवस तरी केवळ शिक्षण विभागाच्या अर्थात शिक्षकांच्या बदल्यांमध्येच जात होते. सर्वाधिक शिक्षक संख्या लक्षात घेता आणि दुर्गम आणि सपाटीचा भाग हे पूर्वीच्या अध्यादेशाप्रमाणे बदल्यांना प्राधान्य दिले जात होते. त्यामुळे शिक्षक बदल्यांचा मोठा ताण प्रशासनावर राहत होता तो यंदापासून कमी झाला आहे.
केवळ आरोग्य विभागाचा मोठा आकडा बदल्यांबाबत राहणार आहे. आरोग्य विभागातील कर्मचा:यांची एकुण संख्या लक्षात घेता टक्केवारीनुसार जवळपास 70 ते 75 कर्मचा:यांच्या बदल्या होणार आहेत. इतर विभागांचा बदल्या या किमान 15 व जास्तीत जास्त 30 ते 35 संख्येने राहणार आहेत.
पदाधिकारी बसू शकणार
बदल्यांच्या समुपदेशन प्रक्रियेत अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि संबधीत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना बसता येणार आहे. त्यांच्या देखरेखेखाली ही प्रक्रिया पार पडणार आहे. 
 

Web Title: Filing of many for transfer to Nandurbar Zilla Parishad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.