कुकडीपादरला भरला वनभाजी महोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2018 12:31 PM2018-09-14T12:31:28+5:302018-09-14T12:31:38+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
वाण्याविहीर : जैवविविधता व्यवस्थापन समिती व एकलव्य ग्रामीण आदिवासी विकास मंडळ कंजाला यांच्या सहयोगाने कुकडीपादर येथे वनभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. 45 महिलांनी 58 प्रकारच्या वनभाजीचे पदार्थ व भाज्या बनवून या महोत्सवात सहभाग घेतला.
अध्यक्षस्थानी भाजपाचे प्रदेश सदस्य नागेश पाडवी तर प्रमुख अतिथी म्हणून दरबारसिंग पाडवी, पं.स.च्या माजी सभापती रूषाबाई पाडवी, पं.स. सदस्य राधाबाई वसावे, गेनाबाई दिनकर पाडवी, पं.स.चे माजी अशोक राऊत, सुरेश वसावे, कुकडीपादरचे सरपंच फत्तेसिंग वसावे, बिजरीगव्हाणचे सरपंच रोशन दिनकर पाडवी, माजी सरपंच सांगल्या वसावे, रामसिंग वळवी उपस्थित होते.
या वेळी रामसिंग वळवी, अशोक राऊत, दरबारसिंग पाडवी, नागेश पाडवी यांनी आदिवासी समाजात पूर्वी आहारात असलेल्या पौष्टीक वनभाज्यांची माहिती दिली. कुकडीपादरचे उपसरपंच दिलीप तडवी, भूपेंद्र पाडवी, छत्रसिंग वसावे, जनार्दन वसावे, भगवान तडवी, हरिश्चंद्र तडवी, हितेश पाडवी, भगू तडवी, सागर वळवी, कालूसिंग वसावे, विकास तडवी, एकलव्य संस्थेचे मनोहर पाडवी, रायसिंग वळवी, जयसिंग सोमा वसावे, मानसिंग वसावे, शांताबाई वसावे, अजबसिंग वसावे यांच्यासह कुकडीपादर व परिसरातील महिला व पुरुष उपस्थित होते.