अखेर नंदुरबारात मोकाट गुरे पकडण्याची मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:28 AM2021-01-18T04:28:30+5:302021-01-18T04:28:30+5:30
नंदुरबार : पालिकेने बाजार समिती आवारात नव्याने कोंडवाडा तयार केला असून तेथे आता मोकाट गुरांना टाकले जाणार आहे. पालिका ...
नंदुरबार : पालिकेने बाजार समिती आवारात नव्याने कोंडवाडा तयार केला असून तेथे आता मोकाट गुरांना टाकले जाणार आहे. पालिका रविवारपासून याबाबतची मोहीम सुरू करीत आहे. जनावर मालकांना प्रतिदिन २०० रुपये दंड आकारला जाणार आहे.
नंदुरबारात मोकाट गुरे व मोकाट कुत्रे यांची समस्या मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे अनेकवेळा अपघात देखील झाले आहेत. मोकाट गुरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून करण्यात येत होती. कामात कुचराई बद्दल पालिकेने सफाई ठेकेदार यांना ५० हजारांचा दंडही ठोठावला आहे. त्यामुळे आता सेवा फाउंडेशन या सफाई ठेकेदार संस्थेने मोकाट गुरे पकडण्याची मोहीम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी पालिकेने त्यांना कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात कोंडवाडा उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामुळे रविवारपासून या मोहिमेला सुरुवात होणार आहे. गुरे मालकांनी आपली गुरे बांधून ठेवावी तसेच गुरे जप्त केल्यानंतर त्यांना सोडविण्यासाठी मालक आल्यास त्यांना प्रतिदिन २०० रुपये दंड भरावा लागणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.