अखेर ‘सीसीटीव्ही’चा मुहूर्त गवसला : नंदुरबार बसस्थानक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 12:34 PM2018-02-20T12:34:34+5:302018-02-20T12:34:42+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : नंदुरबार येथील बसस्थानकावर ह्यसीसीटीव्हीह्ण कॅमेरे बसविण्यासाठी एसटी महामंडळाला अखेर मुहूर्त गवसला आह़े बसस्थानकार 13 ठिकाणी कॅमेरे बसविण्यात येत आहेत़ महिला सुरक्षिततेच्या दृष्टीने या कॅमेरांना अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले होत़े
याबाबत ह्यलोकमतह्णतर्फे वारंवार वृत्त प्रकाशित करुन पाठपुरावा करण्यात आला होता़ नंदुरबार बसस्थानकावर महिला सुरक्षितता तसेच छेडखानीच्या प्रकारांना आळा बसावा म्हणून या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावे अशी मागणी करण्यात येत होती़ एसटी महामंडळाकडून मुंबई येथील एका खाजगी कंपनीला सीसीटीव्ही बसविण्याचे कामदेखील देण्यात आले होत़े त्यानुसार संबंधित कंपनीने बसस्थानकावर येऊन परिसराची पाहणी केली होती़ परंतु त्यानंतर ह्यसीसीटीव्हीह्ण कॅमेरे बसविण्याची प्रक्रिया थंड बस्त्यात पडली होती़ धुळे येथील डेपो कार्यालयामार्फत सर्व प्रकिया पार पाडली जात असल्याचे नंदुबार आगारातर्फे सांगण्यात आले होत़े परिसरात सोनसाखळी चोरीचा प्रयत्न करण्याची घटना ताजी आह़े याच प्रमाणे अनेक महिला तसेच युवतींच्या छेडखानीच्या प्रकारातही मोठी वाढ झाली होती़ या ठिकाणी अनेक विद्यालय तसेच महाविद्यालयीन युवती ये-जा करीत असतात़ त्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी करण्यात येत होती़ बसस्थानकावर कॅमेरे बसविण्यात आले असले तरी वर्कशॉप परिसरातही याची गरज आह़े या ठिकाणी रात्रीच्या वेळी बसेसचे पार्ट चोरी करण्याच्या प्रकारातही वाढ होत आह़े त्यामुळे या ठिकाणीदेखील कॅमेरे बसविण्याची आवश्यकता असल्याचे सांगण्यात येत आह़े