अखेर कोलवीमाळला पोहोचली वीज : अक्कलकुव्यापासून अवघे 13 किलोमीटर अंतर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2018 12:02 PM2018-02-15T12:02:28+5:302018-02-15T12:02:34+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : सातपुडय़ाच्या दुर्गम भागातील कोलवीमाळ या गावात 25 वर्षानंतर वीजेचा प्रकाश पोहोचला आहे. अक्कलकुवा शहरापासून अवघ्या 13 किलोमीटर अंतरावरील कोलवीमाळ येथे वीज कंपनीकडून वीज वाहिण्या जोडण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर गाव प्रकाशात उजळून निघाले. 25 वर्षापासून प्रलंबित असलेल्या प्रश्नासाठी ग्रामस्थ व भिल्लिस्थान टाईगर सेना यांच्याकडून प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात आला होता.
सातपुडय़ातील विविध गावांमध्ये विजेचा प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. भौगोलिक दृष्टय़ा उंच सखल भागातील गाव पाडय़ांना वीज देण्यासाठी वीज कंपनीकडे योग्य ते साहित्य नसल्याने अनेक गावांना आजवर वीज मिळू शकली नाही. याबाबत तालुक्यातील कोलवीमाळ येथील नागरिकांनी सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला होता. त्यांच्या या पाठपुराव्याला भिलीस्थान टाईगर सेनेचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र पाडवी, नंदुरबार युवा जिल्हाध्यक्ष अजय गावीत व तालुकाध्यक्ष रुपसिंग वसावे यांनी प्रतिसाद देत रास्ता रोको आंदोलन केले होते. या वेळी उपस्थित ग्रामस्थांना वीज वितरण कंपनीकडून वीज देण्याचे जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार आठ महिन्यांपासून सातपुडय़ातील डोंगर आणि वनक्षेत्रात उच्च क्षमतेच्या वीज वाहिनी व उंच मनोरे उभारण्याचे काम सुरू होते. हे काम नुकतेच पूर्णत्वास येवून कोलवीमाळ गावात वीज पोहोचली आहे. गेल्या 25 वषार्पासून अंधारात असलेले गाव प्रकाशमय झाल्याने ग्रामस्थांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे या गावात आदिवासीचे श्रद्धास्थान असलेल्या याहा मोगी मातेची यात्रा गेल्या अनेक वर्षापासून भरवली जात आहे. या यात्रेत हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात. त्यामुळे गावात वीज अपेक्षित होती. परंतु याकडे लोकप्रतिनिधींनीदेखील दुर्लक्ष केल्याने अखेर भिल्लीस्थान टायगर सेनेच्या माध्यमातून ग्रामस्थांना न्याय मिळाल्याने 12 फेब्रुवारी 2018 रोजी रूपसिंग टी. वसावे, गुलाबसिंग वसावे, सरपंच कौशल्या गुमानसिंग तडवी, महावितरणचे अधिकारी, कर्मचारी, सदस्य व विजा पुंजारा यांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले. यावेळी उमेश तडवी, अविनाश वळ्वी सुनील वसावे यासह ग्रामस्थ उपस्थित