अखेर श्रमदानातून महामार्ग पुलाची दुरुस्ती

By admin | Published: February 8, 2017 11:33 PM2017-02-08T23:33:14+5:302017-02-08T23:33:14+5:30

धुळे-सुरत राष्ट्रीय महामार्ग : जिल्हाधिका:यांनी वेळोवेळी आदेश देऊनही महामार्ग प्रशासनाचे दुर्लक्ष

Finally, the repair of the highway bridge from the labor pavement | अखेर श्रमदानातून महामार्ग पुलाची दुरुस्ती

अखेर श्रमदानातून महामार्ग पुलाची दुरुस्ती

Next

नवापूर : धुळे - सुरत राष्ट्रीय महामार्गावरील रायंगण पुलावरील रस्त्याची अत्यंत वाईट दुर्दशा झाली असून, या रस्त्याच्या दुरूस्तीबाबत स्वत: जिल्हाधिका:यांनी लक्ष घालून वारंवार आदेश  देऊनही संबंधित विभागाने दुर्लक्ष केल्याने अखेर ग्रामस्थांनी स्वत: टीकम पावडी घेत माती व मुरूम टाकून पुलावरील जीव घेणे खड्डे बुजवून प्रवाशांचा जीव वाचवण्याचा प्रय} केला आहे.
या पुलाची दुरुस्ती व खोल खड्डे भरण्याची वेळोवेळी मागणी ग्रामस्थांनी केली होती. परंतु पुलाची दुरुस्ती व खड्डे बुजवण्यात आले नाही शेवटी रायंगण व कोठडाच्या गावातील ग्रामस्थांनी श्रमदानातून खड्डे बुजवले. बुधवारी सकाळी साडेदहा वाजता नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामदास पाटील, पो.काँ.निजाम पाडवी, योगेश थोरात, मुकेश पवार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नवलसिंग गावीत रायंगण गावांचे सरपंच अजित गावीत, कोठडा गावांचे सरपंच सुरेश गावीत, माजी उपसभापती दिनकर मावची पागराणचे सरपंच सुरेश गावीत, ग्रामस्थ, सदस्य विपूल वसावे,               अतुल ठिगळे, वीरसिंग कोकणी, महेंद्र गावीत, दामू गावीत, संदीप वसावे, भिमसिंग गावीत आदींनी पुलाच्या शेजारी असलेल्या शेतातून खोद           काम करून ती माती पुलाच्या  रस्त्यावर टाकून खड्डे बुजण्याचे काम केले.
ब:याच वर्षापासून रायंगण गावाच्या ग्रामस्थांनी वेळोवेळी या पुला संदर्भात जिल्हाधिकारी व तहसीलदार यांना निवेदने देण्यात आलेले आहे. या हायवेवर रोज हजारो वाहने ये-जा करीत असतात. रायंगण पूल हा 60 फूट उंच असल्यामुळे या पुलावर बरेच अपघात होऊन जीवित हानी झालेली आहे. मात्र कंत्राटदार व संबंधित अधिकारी या पुलावर दुर्लक्ष करीत आहे. या पुलावर या पुढे अपघात झाल्यास संबंधित राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाच्या अधिका:यांवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी रायंगण व कोठडा ग्रामस्थांनी केली आहे.
या पुलाचे काम लवकर न झाल्यास रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थ व नवसिंग गावीत यांनी दिला आहे. मागच्या दोन महिन्यांपूर्वी पुलाचे संरक्षण कठडे व पुलाचा खालच्या भागातील पिलर दुरुस्तीचे काम स्वत: जिल्हाधिकारी डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी हे काम स्वत: उभे राहून काम सुरू केले होते व त्यावेळी राष्ट्रीय महामार्गाचे अधिका:यांनी काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र त्यांनी काम पूर्ण न करता अर्धवट सोडले आहे. या पुलावर एकतर्फी वाहनांची सुविधा करण्याचे आदेश जिल्हाधिका:यांनी दिले होते. तसेच बेडकीपाडा, वाकीपाडा, रायंगण पूल, सावरट, विसरवाडी, कोंडाईबारी घाट येथे ही रस्त्यांवर मोठ-मोठे खड्डे पडले असून, अपघाताची वाट हे खड्डे पाहत आहे. खड्डे बुजविण्यासाठी राजू वसावे, प्रफुल्ल गावीत, मनोज गावीत, राणू गावीत, दामू गावीत, रहीम खान, नितीन गावीत आशिष गावीत, सुरेश गावीत व ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.
    (वार्ताहर)

 

Web Title: Finally, the repair of the highway bridge from the labor pavement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.