मयत बीएलओ शिक्षकाच्या वारसांना निवडणूक आयोगाकडून आर्थिक मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2020 12:20 PM2020-01-05T12:20:18+5:302020-01-05T12:20:24+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : विधानसभा निवडणूक कर्तव्यासाठी बीएलओ म्हणून कामावर नियुक्त असताना मोरंबा केंद्रशाळेचे शिक्षक किसन लालसिंग नाईक ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : विधानसभा निवडणूक कर्तव्यासाठी बीएलओ म्हणून कामावर नियुक्त असताना मोरंबा केंद्रशाळेचे शिक्षक किसन लालसिंग नाईक यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला होता. निवडणूक आयोगाने नाईक यांच्या कुटुंबीयांसाठी १५ लाख रुपये मंजूर केल्याची माहिती लढा प्राथमिक शिक्षक संघटनेतर्फे देण्यात आली.
मोरंबा ता़ अक्कलकुवा येथील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक किसन नाईक यांची मोरंबा येथेच विधानसभा निवडणुकीसाठी बीएलओ म्हणून नियुक्ती करण्यात आली होती़ यांतर्गत ते २० आॅक्टोबर २०१९ रोजी ते या मतदान केंद्रांतर्गत मतदारांना उशिरापर्यंत वोटर स्लीप वाटप करीत होते़ दरम्यान त्यांची प्रकृती बिघडून हृदयविकाराने त्यांचा मृत्यू झाला होता. घटनेनंनतर त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळावी यासाठी लढा प्राथमिक शिक्षक संघटना आणि जिल्हा प्रशासन यांनी पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्याला यश येऊन नाईक यांच्या वारसांना सानुग्रह अनुदान म्हणून निवडणूक आयोगाकडून १५ लाख रुपये मंजूर करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे़