निराधार कुटुंबाला आर्थिक मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2019 12:03 PM2019-06-01T12:03:12+5:302019-06-01T12:03:18+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क म्हसावद : पुण्योक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त होणारा खर्च टाळून निराधार कुटुंबाला मदत करण्याचा निर्णय येथील ...

Financial support to a helpless family | निराधार कुटुंबाला आर्थिक मदत

निराधार कुटुंबाला आर्थिक मदत

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
म्हसावद : पुण्योक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त होणारा खर्च टाळून निराधार कुटुंबाला मदत करण्याचा निर्णय येथील धनगर समाज बांधवांनी घेतला. अहिल्यादेवी होळकर यांनी दिलेल्या मानवतेच्या शिकवणीनुसार म्हसावद, ता.शहादा येथील धनगर समाजाने एक नवीन आदर्श उभा केला आहे.  ‘माणुसकी अजूनही जिवंत आहे’ याची प्रचिती यानिमित्ताने पहायला मिळाली.
म्हसावद येथील धनगर समाज बांधव नेहमी समाज सुधारणा व मानवतावादी कामांसाठी उपक्रम राबवतात. 13 मे रोजी गावातील साधारण परिस्थिती असलेले संजय माधव धनगर (50) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. संजय धनगर यांच्या पश्चात प}ी व चार मुली आहेत. पैकी एका मुलीचा विवाह झाला आहे. त्यांचा अचानक मृत्यू झाल्याने परिवाराचा मोठा आधारच हरवला. या जाणीवेने समाजात सर्वत्र हळहळ व्यक्त होत होती. अशा परिस्थितीत समाजातील तरुणांनी वरिष्ठांशी चर्चा करून पुण्योक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीवर यंदा होणारा खर्च गोळा करून मुलींच्या भविष्याकरिता  सुरक्षित करण्याचे नियोजन केले.  तसा संदेश व्हाट्सअप ग्रुपवर टाकण्यात आला. या संदेशाला प्रतिसाद देत समाजातील  लोकांनी मनाचा उदारपणा दाखवित 50 हजार रूपयांचा मदत निधी  गोळा केला. यापैकी काही  निधी संजय धनगर यांच्या दशक्रिया व उत्तरक्रिया विधीसाठी रोखीने देण्यात आला आणि तीन अविवाहित मुलींच्या नावे प्रत्येकी 15 हजार रुपये दुप्पट लाभाच्या योजनेत गुंतवण्यात आले. समाजाच्या या बांधिलकीने या परिवाराचे अश्रू अनावर झाले. या वेळी धनगर समाज बांधव उपस्थित होते.

Web Title: Financial support to a helpless family

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.