बनावट दारू निर्मितीची साखळी शोधावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2020 12:33 PM2020-04-20T12:33:50+5:302020-04-20T12:34:11+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरातील मध्यवर्ती भागात आणि नेहमीच पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचे येणे-जाणे असलेल्या रस्त्याच्या शेजारी बनावट दारू ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शहरातील मध्यवर्ती भागात आणि नेहमीच पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचे येणे-जाणे असलेल्या रस्त्याच्या शेजारी बनावट दारू तयार करण्याचा कारखाना गेल्या दोन वर्षांपासून सुरू होता याबाबत आता चर्चा सुरू आहे. दारू बनविणाºयाला कुणाचा आशिर्वाद होता, त्याने आणलेले साहित्य कुठले होते याचा शोध घेतला जावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.
नंदुरबारातील साक्रीनाका नजीक दसेरा मैदानावर अतिक्रमीत जागेत गोडावून बांधून त्या ठिकाणी अवैध दारू निर्मितीचा कारखाना सुरू होता. शहर पोलिसांनी हा कारखाना उध्वस्त केला असून त्याला चालविणाºया एकाला अटक केली आहे. या ठिकाणी सुरू असलेला हा कारखाना गेल्या दोन वर्षापासून बिनधिक्कत सुरू असल्याची चर्चा आता जोर धरू लागली आहे. मध्यवर्ती भागात सुरू असलेला कारखान्याबाबत पोलीस, राज्य उत्पादन शुल्क विभाग यांना माहिती नव्हती का? माहिती असूनही दुर्लक्ष का केले गेले याबाबत आता प्रश्न उपस्थित होत आहेत. कारखाना चालविणाºयाच्या मागे कुणाचा आशिर्वाद होता. त्याला कुणाचे पाठबळ होते. याचीही चौकशी करण्याची मागणी पुढे येत आहे. या ठिकाणाहून जप्त करण्यात आलेले साहित्य कुणाचे आहे. कुणी त्याला पुरविले असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. अनेकांच्या जिवाशी खेळणारा हा प्रकार आहे.
सखोल चौकशी करून बनावट दारू निर्मितीमागील साखळी शोधून काढावी, या व्यवसायातील अंतर्गत राजकारण शोधून काढावे अशी अपेक्षाही शहरवासीयांकडून व्यक्त केली जात आहे.
शहरात लॉकडाऊनमध्येही शहरातील काही ठिकाणी अवैध मद्य विक्री होत असल्याच्या तक्रारी आहेत. शहरातील आजूबाजूच्या निर्जन परिसरात बसून तळीराम दारू रिचवत आहेत. काही ठिकाणी बैठका देखील बसत आहेत. त्यामुळे पोलिसांनी अशा भागात गस्त वाढविण्याची मागणी होत आहे.