तळवे शिवारात शॉर्टसर्किटने उसाच्या क्षेत्रास आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2017 12:21 PM2017-11-06T12:21:04+5:302017-11-06T12:21:04+5:30
दहा एकरावरील ऊस जळाला, महावितरणकडून दुर्लक्ष
Next
ठळक मुद्देमहावितरणचा भोंगळ कारभार सुरुच
ल कमत न्यूज नेटवर्कतळोदा : शॉर्टसर्किटने उसाच्या क्षेत्रास आग लागून तब्बल 10 एकरावरील ऊस जळून खाक झाल्याची घटना तळोदा तालुक्यातील तळवे शिवरात शनिवारी घडली़ यात शेतक:यांचे साधारणत 5 लाखांचे नुकसान झाल्याचा पंचनामा करण्यात आला आह़ेया घटनेमुळे परिसरातील शेतक:यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आह़े तळोदा तालुक्यातील सलसाडी येथील शेतकरी भामटय़ा भिल यांची तळवे शिवारात 12 एकर शेती आहे. यातील 10 एकर क्षेत्रात गेल्या वर्षी ऊस लावण्यात आला होता़ ब:यापैकी रासायनिक खते व खर्च लावण्यात आला होता़ त्यामुळे ऊसाचे उत्पादनही समाधानकारक होते. परंतु शनिवारी दुपारच्या सुमारास अचानक शेतात असलेल्या लोंबकळलेल्या वीज तारांचे अचानक शॉर्टसर्किट झाल्यामुळे आगीच्या ठिणगी उसाच्या क्षेत्रास लागली़ त्यानंतर पाहता-पाहता संपूर्ण उस जळून खाक झाला़ हा प्रकार शेतमालाकाला माहित पडल्यानंतर संबंधित शेतमालक व परिसरातील शेतकरी तेथे पोहोचल़े परंतु तोर्पयत संपूर्ण ऊस जळून खाक झाला होता. या महिन्याच्या अखेरीस ऊस तोडला जाणार होता. मात्र त्या आधीच शॉर्टसर्किटने ऊस जळून गेल्याने शेतक:यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरवाला गेला आह़े त्याच प्रमाणे यात शेतक:याच प्रचंड नुकसान झाले असल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आह़े दरम्यान या प्रकरणी शेतमालक भामटय़ा भिल यांच्या फिर्यादीवरुन तळोदा पोलिसांनी अगिAउपद्रवाची नोंद केली आह़े तपास हवालदार राजेंद्र बिराडे करीत आह़ेजळाल्यामुळे उसाच्या दर्जावर परिणामसध्या गळीत हंगाम सुरु असल्याने सर्वत्र शेतकरी आपला ऊस कारखान्यांना देत आहेत़ परंतु जळालेल्या उसाला कोण भाव देणार असा प्रश्न आता पिडीत शेतक:यांना सतावत आह़े जळालेल्या उसाचे वजनही कमी भरत असल्याने योग्य भाव मिळत नसतो़