नंदुरबारातील बॅक ऑफ इंडियाच्या शाखेला आग लागून 11 लाखाचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2019 11:47 AM2019-01-29T11:47:34+5:302019-01-29T11:47:40+5:30
नंदुरबार : शहरातील अमर-अमृत चौकातील बँक ऑफ इंडियाच्या शाखेला आग लागून 11 लाख रुपयांचे नुकसान झाल़े मंगळवारी पहाटेच्या सुमारास ...
नंदुरबार : शहरातील अमर-अमृत चौकातील बँक ऑफ इंडियाच्या शाखेला आग लागून 11 लाख रुपयांचे नुकसान झाल़े मंगळवारी पहाटेच्या सुमारास ही आग लागली होती़
मंगळवारी पहाटेच्या सुमारास बँक ऑफ इंडियाच्या शाखेतून धूर येत असल्याचे परिसरातील नागरिकांना दिसून आले होत़े बँक बंद असल्याने नेमकी स्थिती समजून आली नव्हती़ दरम्यान काही वेळाने बँकेच्या खिडकीत आगीचे लोळ उठत असल्याचे नागरिकांना दिसून आल़े त्यांनी बँक अधिकारी व कर्मचारी यांना माहिती दिली़ त्यानंतर तात्काळ अगिAशामन बंबाला पाचारण करण्यात आल़े बँक उघडल्यानंतर आगी विझवण्याचा प्रयत्न झाला़ परंतू तोवर बँकेतील महत्त्वाच्या कागदपत्रांसह 11 लाख 61 हजार रुपयांचे साहित्य जळून खाक झाले होत़े बँकेतील लॉकर रुम आणि कॅश सुरक्षित राहिल्याने मोठे नुकसान टळल़े याप्रकरणी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात अगAीउपद्रव दाखल करण्यात आला आह़े ही आग शॉर्टसर्किटने लागल्याचे सांगण्यात येत असून पोलीस तपास सुरु आह़े