तळोदा येथे आगीत घर जळून खाक
By admin | Published: February 4, 2017 12:42 AM2017-02-04T00:42:08+5:302017-02-04T00:42:08+5:30
कापड व्यापा:याचा वाचला जीव : घरातील लाखो रूपयांचे कपडे जळाले
तळोदा : घरातील गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने लागलेल्या आगीत तळोद्यातील कापड व्यावसायिकाचे घर जळून खाक झाल़े या आगीत घरात ठेवण्यात आलेल्या तयार कपडय़ांच्या मालासह आगीची सूचना देणारा ‘पाळीव कुत्रा’ जळून खाक झाला़ शुक्रवारी पहाटे दीड वाजेच्या सुमारास लागलेल्या आगीला विझवण्यासाठी नंदुरबार येथून अगिAशामन बंब बोलावण्यात आला होता़
तळोदा शहरातील मेनरोडवर सोनारवाडा परिसरात घडलेल्या या घटनेची माहिती रात्री तळोदा शहरात वा:यासारखी पसरली होती़ ही आग विझवण्यासाठी परिसरातील नागरिक व युवकांसह पोलीस कर्मचारी सहकार्य करत होत़े पहाटे उशिरार्पयत सुरू असलेली आग अगिAशामन बंबांनी आटोक्यात आणली़ या आगीत कोचर यांचे घरातील साहित्य व कपडा माल असा एकूण 13 लाख रुपयांचा ऐवज जळून खाक झाल्याची माहिती देण्यात आली आह़े (वार्ताहर)
एकीकडे शहरात भिषण आग लागल्यानंतर नागरिकांनी तत्काळ तळोदा अगिAशमन दलाच्या अधिका:यांना ही माहिती दिली होती़ मात्र तळोदा येथील अगिAशमन दलाचे वाहन परिवहन विभागाच्या अधिका:यांनी निरूपयोगी ठरवल्याने नव्या वाहनाची प्रतीक्षा तळोदा पालिकेच्या अगिAशमन दलाला आह़े येत्या काही दिवसात हे वाहन तळोदा अगिAशमन दलाच्या ताफ्यात दाखल होणार असल्याची माहिती देण्यात आली असली, तरी तूर्तास मात्र नंदुरबार किंवा शहादा येथील बंब बोलवावे लागत आहेत़ शुक्रवारी पहाटे लागलेल्या आगीवेळीही नंदुरबार येथील अगिAशामन बंब बोलावण्यात आला होता़ या बंबाला येण्यास उशीर झाल्याने आग वाढून नुकसान झाल्याने नागरिकांकडून सांगण्यात येत आह़े या दुर्घटनेचे वृत्त कळताच नगरपालिकेचे प्रतोद भरत माळी, सुभाष चौधरी, माजी उपनगराध्यक्ष गौरव वाणी यांनी कोचर यांच्या घराची पाहणी केली़ कोचर यांनी दिलेल्या खबरीवरून तळोदा पोलिसात अकस्मात आगीची नोंद झाली आह़े
जीव वाचवणा:या कुत्र्याचा मृत्यू
तळोदा येथील तयार कपडय़ांचे व्यापारी नरेश गुमानलाल कोचर हे पत्नी रश्मी यांच्यासह सोनारवाडय़ात राहतात़ याठिकाणी त्यांचे कपडय़ांचे गोडावूनही आह़े गुरुवारी नेहमीप्रमाणे दुकानातील कामे आटोपून ते घरी गेले होत़े याचवेळी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास घरातील सिलिंडर फुटल्याने खालच्या मजल्यावर ठेवण्यात आलेल्या कपडय़ांच्या गठ्ठय़ांना आग लागली़ ही आग फोफावत असतानाच त्यांच्या पाळीव कुत्र्याचे भुंकणे सुरू झाल़े कोचर यांना जाग आली त्यांना आग दिसून आल्यानंतर त्यांनी पत्नीला घरातून बाहेर काढल़े आग लागल्याचे लगतच्या नागरिकांना दिसून आल्यानंतर त्यांनीही घटनास्थळाला भेट देत आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केल़े
प्लास्टिक पिशव्यांमध्ये असलेल्या कपडय़ांच्या गठ्ठय़ांना लागलेली आग फोफावत असतानाच त्या आगीची सूचना देणारा कुत्रा मात्र बळी ठरला, ही बाब नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी कुत्र्याचे प्राण वाचवण्याचे आटोकाट प्रयत्न केल़े मात्र कुत्र्याला वाचवण्यात सगळ्यांना अपयश आल़े मालकाचा जीव वाचणारा कुत्रा मेल्याने हळहळ व्यक्त होत होती़