डबल दिवाळीतही फटाके बाजार ओस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2019 10:52 AM2019-10-25T10:52:05+5:302019-10-25T10:52:10+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : ऐन दिवाळीच्या तोंडावर न्यायालयाने फटाक्यांवर काही अंशी बंदीचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे ग्राहकांवर मोठा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : ऐन दिवाळीच्या तोंडावर न्यायालयाने फटाक्यांवर काही अंशी बंदीचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे ग्राहकांवर मोठा परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. सद्यस्थिती दीपोत्सव शिवाय विधानसभा निवडणुकीचा निकालही लागला, त्यामुळे फटाके मोठी उलाढाल होईल, असे फटाके विकेत्यांमार्फत वर्तविण्यात आले होते. परंतु दुहेरी उत्सव असतानाही या बाजारात शुकशुकाट दिसून आला.
चार वर्षापूर्वी 2015 मध्ये शालेय विद्याथ्र्यानी फटाक्यांमुळे होणा:या प्रदूषण थांबविण्यासाठी फटाके विक्रीला विरोध केला. एवढेच नव्हे तर त्या विद्याथ्र्यांनी आपल्या पालकांमार्फत सुप्रीम कोर्टात याचिकाही दाखल केली होती. यावर सुप्रीम कोर्टाने प्रदुषण नियंत्रण मंडळ आणि काही अभ्यासक व तज्ज्ञ संघटनांकडून फटाक्यांवर प्रतिक्रिया मागविल्या. या प्रतिक्रियांनुसार विद्याथ्र्याच्या या याचिकेवर ऐन दिवाळीच्या तोंडावर सुप्रिम कोर्टाने काही अंशी फटाके विक्रीवर बंदीचा निर्णय दिला. या निर्णयात सरसकट फटाक्यांची विक्री करता येणार नसून केवळ नोंदणीकृत विक्रेत्यांनाच विकता येणार असल्याचे कोर्टाने बजावले.
तज्ज्ञांकडून देण्यात आलेल्या प्रतिक्रियांमध्ये फटाका उद्योगामुळे हजारो कामगारांचा उदरनिर्वाह हात असल्याचे देखील सांगण्यात आले होते. त्यामुळे पूर्णपर्ण बंदी घातली नाही. असे असतानाही दिवाळीच्या पाश्र्वभूमीवर दरवर्षी प्रमाणे यंदाही नंदुरबार येथील तालुका क्रीडा संकुलात फटाक्यांचे अनेक स्टॉल लागले आहेत. सद्यस्थितीत दीपोत्सवासह जिल्ह्यात विधानसभेचा उत्सव देखील सुरू आहे. या दुहेरी उत्सवांमुळे नेहमीप्रमाणे यंदा फटाके बाजारातील दुपटीने भर पडणे अपेक्षित होते. त्यानुसार नंदरबार येथील फटाके विक्रेत्यांनी स्टॉलही लावले, परंतु ऐन दीपोत्सवाच्या कालावधीतच सर्वोच्च न्यायालयाने काही अंशी बंदीचा निर्णय घेतल्यामुळे ग्राहकांची फटाके खरेदीबाबत फारशी रुची दिसून येत नाही. निवडणूक निकालाच्या दिवशी तरी विक्री वाढल अशी अपेक्षा विक्रेत्यांकडून व्यक्त करण्यात आली. परंतु या दिवशीही फटाके बारात शुकशकाट दिसून आला. त्यामुळे फटाके बाजारावर कोर्टाच्या निकालाचाच परिणाम असल्याचे म्हटले जात आहे. नंदुरबारच्या या फटाका बाजारात अपेक्षेनुसार आर्थिक उलाढाल होत नसल्याचे तेथील विक्रेत्यांमार्फत सांगण्यात आले आहे.