राज्यातील पहिले आयुष रुग्णालय नंदुरबारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2018 12:03 PM2018-03-26T12:03:43+5:302018-03-26T12:03:43+5:30
पंतप्रधान भुमिपूजनाला येणार : हिना गावीत यांची माहिती
लोकमत ऑनलाईन
नंदुरबार, दि़ 26 : राज्यातील पहिल्या आयुव्रेदीक अर्थात आयुष रुग्णालयाच्या भुमिपूजनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने प्रय} सुरू असल्याची माहिती खासदार डॉ.हिना गावीत यांनी येथे बोलतांना दिली.
जिल्हा रुग्णालयात रविवारी दंत व सर्व रोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते त्याचे उद्घाटन खासदार डॉ.हिना गावीत यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी आमदार डॉ.विजयकुमार गावीत, जिल्हाधिकारी डॉ.एम.कलशेट्टी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.आर.डी.भोये आदी उपस्थित होते. यावेळी बोलतांना डॉ.हिना गावीत यांनी सांगितले, राज्यातील पहिले आयुव्रेदीक रुग्णालय नंदुरबारला मंजुर झाले आहे. 50 खाटांचे हे रुग्णालय असून त्यात आयुव्रेदानुसार सर्व प्रकारचे उपचार करण्यात येणार आहे. जिल्हा रुग्णालयाच्या आवारातच हे रुग्णालय उभे राहणार आहे. पुढील महिन्यात या रुग्णालयाचे भुमिपूजन करण्यात येणार आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपण आमंत्रण दिले असून त्यांनी प्रथमदर्शनी होकार दिला आहे. त्याकरीता आपला पाठपुरावा कायम राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
जिल्हा रुग्णालयाच्या परिसरातच 100 खाटांचे महिला रुग्णालय देखील उभारण्यात येत आहे. त्याचे कामही 60 टक्केपेक्षा अधीक झाले आहे. यामुळे शहरी भागासह आदिवासी भागातील महिलांना देखील त्याचा उपयोग होणार आहे. वैद्यकीय महाविद्यालय नंदुरबारात मंजुर आहे. ते लवकरात लवकर सुरू व्हावे यासाठी आपला प्रय} सुरू आहे. त्याकरीता लागणा:या सर्व प्राथमिक सुविधा उपलब्ध करून घेण्यासाठी आपला राज्य व केंद्रस्तरावर पाठपुरावा सुरू असल्याचेही डॉ.हिना गावीत यांनी स्पष्ट केले.
आमदार डॉ.विजयकुमार गावीत यांनी देखील यावेळी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक डॉ.आर.डी.भोये यांनी केले.
अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.के.डी.सातपुते, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.शरद काळे, अधिसेविका निलीमा वळवी यांच्यासह वैद्यकीय तज्ज्ञ उपस्थित होते.