सीसीआयची पाटी पहिल्याच दिवशी कोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2018 12:39 PM2018-11-30T12:39:23+5:302018-11-30T12:39:40+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पळाशी येथील कापूस खरेदी केंद्रात सीसीआय अर्थात कॉटन कार्पोरेशन ऑफ ...

The first day of CCI | सीसीआयची पाटी पहिल्याच दिवशी कोरी

सीसीआयची पाटी पहिल्याच दिवशी कोरी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पळाशी येथील कापूस खरेदी केंद्रात सीसीआय अर्थात कॉटन कार्पोरेशन ऑफ इंडिया गुरुवारी कापूस खरेदीसाठी उतरला होता़ परंतू कापसाचे दर हमीभावापेक्षा अधिक झाल्याने शेतक:यांनी व्यापा:यांना कापूस विक्री केला़ यामुळे सीसीआयची पाटी पहिल्या दिवशीही कोरीच होती़ 
गेल्या चार दिवसांपासून कापसाचे दर हमीभावापेक्षा कमी झाल्याचा लाभ घेत सिसीआयने बन्नी व  ब्रम्हासाठी 5450 तर एच फोर, एच सिक्स, मेच व आरसीएच दोन या जातीच्या कापसासाठी 5350 रुपये प्रतीक्विंटल भाव जाहीर करुन खरेदीची तयारी दर्शवली होती़ यानुसार संबधित प्रतिनिधी गुरुवारी सकाळी खरेदी केंद्रावर हजर झाले होत़े परंतू सकाळी कापूस दर हे 5 हजार 375 रुपये प्रतिक्विंटल दरापासून सुरु झाल़े तर अंतिम दर हा 5 हजार 400 रुपये प्रतीक्विंटल होता़ परिणामी येणारा कापूस 5 हजार 350 रुपयांच्या रेषेतील असल्याने शेतक:यांनी परवानाधारक व्यापा:यांना बाजारभावाने कापूस विक्री केला़ यामुळे दिवसभरात सीसीआयकडे एक क्विंटलही कापूस आवक झालेली नाही़ दरम्यान सीसीआयकडून कापूस खरेदीपूर्वी आधार, सातबारा  आदीची मागणी करण्यात येत असल्याने शेतकरी पाठ फिरवत असल्याची माहिती आह़े तात्काळ कापूस विक्री करुन पैसे घेत व्यवहार पूर्ण करण्याची इच्छा शेतक:यांची असत़े परंतू कागदोपत्री कामकाजामुळे हा व्यवहार अडखळण्याची भिती असल्याने शेतकरी व्यापा:यांना कापूस विक्री करत असल्याचेही सांगण्यात येत आह़े 
शहादा येथेही सीसीआयचे केंद्र आजपासून सुरु झाले होत़े परंतू येथेही कापूस आवक मंदावल्याची माहिती आह़े सीसीआयपेक्षा शेतकरी शहादा बाजार समितीने नेमून दिलेले व्यापारी आणि सूतगिरणीला कापूस विक्री करत आहेत़ 
पळाशी येथील कापूस खरेदी केंद्रात गुरुवाअखेर्पयत 7 हजार 575 क्विंटल कापूस आवक झाली आह़े यंदाची ही आवक गत पाच वर्षातील सर्वाधिक कमी आवक असल्याची माहिती देण्यात आली आह़े  
दुसरीकडे शहादा बाजार समितीत गुरुवारी दिवसभरात 1 हजार 600 क्विंटल कापूस शेतक:यांकडून खरेदी करण्यात आला़ या कापसाला 5 हजार 350 ते 5 हजार 400 हाच दर होता़ तर तालुक्यातील सहकारी तत्त्वावरील सूतगिरणीत प्रतिक्विंटल 5 हजार 500 रुपये दर असल्याने शेतक:यांनी तेथेही कापूस विक्री केला़ शहादा तालुका आणि लगतच्या परिसरातून आतार्पयत बाजार समितीचे खरेदी केंद्र आणि सतूगिरणी येथे 28 हजार क्विंटल कापूस विक्री केल्याची माहिती आह़े यंदा तालुक्यात दुष्काळामुळे निम्मेच कापूस उत्पादन आल्याने शेतकरी हताश झाले आहेत़
शहादा केंद्रातही सीसीआयच्या अधिका:यांनी गुरुवारी कापूस खरेदी सुरु केली परंतू ऑनलाईन नोंदणीच्या आग्रहामुळे त्यांच्याकडे कापूस देण्याबाबत शेतक:यांमध्ये औदासिन्य होत़े येथे यंदा प्रथमच सीसीआयचे केंद्र सुरु करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आह़े 
एकीकडे नंदुरबार तालुक्यातील कापूस खरेदी केंद्रांची स्थिती कमकुवत होत असताना मिरची आवक मात्र दिवसेंदिवस वाढत आह़े गुरुवारी दुपार्पयत बाजार समितीत 75 हजार क्विंटल मिरची आवक झाली होती़ ओल्या मिरचीला 1 हजार 900 ते 3 हजार 400 आणि कोरडय़ा मिरचीसाठी 3 हजार 200 ते 9 हजार 400 असा दर देण्यात येत असल्याने शेतकरी दर दिवशी बाजाराकडे धाव घेत आहेत़ येत्या आठवडय़ात बाजारात तीन वर्षानंतर 1 लाख क्विंटल मिरचीची आवकचा विक्रमी पल्ल गाठला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आह़े दरम्यान बाजारात गुजरात राज्यातील हिरव्या मिरचीचीही आवक झाल्याने यंदा मिरची हंगाम शेतक:यांसह व्यापारी आणि मजूरांनाही सुखावत आह़े     

Web Title: The first day of CCI

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.