जिल्ह्यात गट शेतीचा पहिला प्रयोग यशस्वी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2018 11:09 AM2018-12-08T11:09:06+5:302018-12-08T11:09:10+5:30
100 एकर क्षेत्रात दुधाळ पशुंसाठी हिरवे वैरणचे उत्पादन
रमाकांत पाटील ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : राज्य शासनाने गेल्या दोन वर्षापासून गटशेतीला प्रोत्साहन देण्यासाठी योजना सुरू केली असली तरी अद्याप या योजनेला आकार आला नाही. मात्र, याही स्थितीत काही नवीन करण्याचे धाडस आणि तंत्रज्ञानाचा वेध घेत फेस, ता.शहादा येथील 23 शेतक:यांनी एकत्र येत 107 एकर क्षेत्रात हिरवे वैरण उत्पादनाचा प्रयोग यशस्वी केला आहे.
कमी शेती असलेल्या शेतक:यांनी एकत्र येवून पारंपारिक पिकांपेक्षा नवे तंत्र व शेतीतील नवीन प्रयोग राबवावेत किंबहुना आपल्या शेतात केवळ पिकाचेच उत्पन्न न घेता त्यावर प्रक्रिया करून तो माल बाजारात विकावा व शेतकरी विकसीत व्हावा या उद्देशाने राज्य शासनाने गट शेतीची योजना दोन वर्षापूर्वी कार्यान्वीत केली. प्रत्येक जिल्ह्याला प्रायोगीक तत्वावर असे किमान पाच-पाच गट स्थापन करण्याचे उद्दीष्ट होते.
मात्र पहिल्या वर्षी त्याला फारसे यश मिळालेले नाही. नंदुरबार जिल्ह्यात फेस येथील शेतक:यांनी त्यासाठी पुढाकार घेतला होता. येथील एकाच ठिकाणी शेती असलेले 23 शेतकरी एकत्र येवून त्यांनी गणराज शेतमाल उत्पादक गटाची स्थापना केली. त्यांच्या 107 एकर क्षेत्रात असा प्रयोग राबविण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी सुरेश पाटील यांनी पुढाकार घेवून आपल्याला अवगत असलेले तंत्र तसेच कृषी क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञानाचा अभ्यास करून त्यांनी दुधाळ जनावरांसाठी हिरवे वैरण लावण्याची योजना तयार केली.
अर्थात याबाबत सुरुवातीला ही योजना शेतक:यांच्या फारशी पचनी पडली नाही. मात्र त्यांनी त्यांचे प्रय} सुरू ठेवले. त्यांनी स्वत: थायलंडमध्ये उत्पादीत होणा:या चा:याचे बियाणे मागवून आपल्या शेतात प्रयोग सुरू केला होता. त्यालाच विस्तार करीत ते पुर्ण 107 एकर क्षेत्रात गट शेतीच्या माध्यमातून राबविला. बँकेकडून कर्ज मिळण्यास अडथळा आल्याने स्वत: शेतक:यांनी खर्च करून योजना यशस्वी करण्यासाठी प्रय} सुरू ठेवले. आज या ठिकाणी हिरव्या चा:याची अनोखी शेती तयार झाली असून त्याचे उत्पादनही सुरू झाले आहे. चांगल्या गुणवत्तेचा चारा या ठिकाणी उत्पादीत होत आहे. गेल्या आठ दिवसांपासून येथील चा:याचे उत्पादन सुरू झाले असून रोज आठ ते दहा टन चा:याचे उत्पादन सुरू झाले आहे.