एसटी जात पडताळणी अभिप्रायाला हिवाळी अधिवेशनाचा ‘खोडा’, मंत्रिमंडळ उपसमितीची झाली पहिली बैठक
By संतोष.अरुण.सूर्यवंशी | Published: December 1, 2017 12:14 PM2017-12-01T12:14:45+5:302017-12-01T12:15:03+5:30
संतोष सूर्यवंशी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : अनुसूचित जमातीसाठीच्या नियम 2003 मध्ये सुधारणा करण्याबाबत अभिप्राय देण्यासाठी राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली उपसमिती नेमण्यात आली आह़े समितीची पहिली बैठक मुंबई येथे मंगळवारी घेण्यात आली़ समितीने एका महिन्याच्या आत अभिप्राय देणे अपेक्षीत आह़े परंतु हिवाळी अधिवेशनामुळे या अभिप्रायाचा खोळंबा होणार आह़े
11 डिसेंबर रोजी नागपूर येथे हिवाळी अधिवेशन होणार आह़े त्यानंतरच पुढील बैठका होणार असल्याचे सांगण्यात आल़े त्यामुळे एका महिन्यांच्या आत अभिप्राय देणे आवश्यक असताना हिवाळी अधिवशेनामुळे यास उशिर होणार आह़े रक्तनाते संबंधातील जात वैधता प्रमाणपत्राच्या आधारे कुटुंबातील इतर व्यक्तींना जात वैधता प्रमाणपत्र देण्याची तरतूद करण्यासाठी जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे नियम 2012 मध्ये बदल व सुधारणा करण्यासाठी मंत्रिमंडळाने सहमती दिली आह़े याच धर्तीवर अनुसूचित जमातीसाठीच्या नियम 2003 मध्ये सुधारणा करण्याबाबत अभिप्राय देण्यासाठी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आठ सदस्यी समिती नेमण्यात आली आह़े
हिवाळी अधिवेशनात होणार चर्चा.
11 डिसेंबर रोजी हिवाळी अधिवेशन होणार आह़े त्यामुळे या अधिवेशनात अनुसूचीत जमातीच्या जात वैधता प्रमाणपत्राचा मुद्दा चांगलाच गाजणार असल्याचे दिसून येत आह़े राज्यभरात अनुसूचीत जमातीची हजारो प्रकरणे प्रलंबित आह़े त्यामुळे या उपसमितीच्या अभिप्रयावर सर्वाचे लक्ष लागून आह़े
बुधवारी झालेल्या पहिल्या बैठकीत समिती अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अधिका:यांकडून प्रलंबि प्रकरणांचा आढावा घेतला अनुसूचीत जमातीची एकूण किती प्रकरणे पेंडींग आहेत, आता र्पयत किती निकाली निघाली, रक्तनाते संबंधांवर आधारीत किती प्रकरणे प्रलंबित आहेत आदींची माहिती घेतली़ अनुसूचीत जमातींच्या प्रकरणांबाबत उच्च न्यायालयाकडून वेळावेळी आलेल्या निकालांचाही तपशीलवार आढावा घेतला़ या वेळी राज्याचे महसूलमंत्री व समिती अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना विचारले असता त्यांनी सांगितले की़, मंत्रिमंडळाच्या उपसमितीची आज पहिली बैठक झाली़ या बैठकीत अनुसूचीत जमाती जात पडताळणी समितीच्या सर्व अधिका:यांकडून विभागनिहाय आढावा घेण्यात आला़ पुढील बैठक हिवाळी अधिवेशनानंतर होईल़