घराला हातभार लावून केंद्रात मिळवला प्रथम क्रमांक

By admin | Published: June 2, 2017 06:03 PM2017-06-02T18:03:19+5:302017-06-02T18:03:19+5:30

बारावी परीक्षा उत्तीर्ण : तळोद्याच्या मृणालला व्हायचय इलेक्ट्रीकल इंजीनिअर

The first number in the center of the house by contributing to the home | घराला हातभार लावून केंद्रात मिळवला प्रथम क्रमांक

घराला हातभार लावून केंद्रात मिळवला प्रथम क्रमांक

Next
>ऑनलाईन लोकमत
तळोदा,दि.2 - कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अतिशय बेताची़ त्यामुळे वडील उदरनिर्वाहासाठी  छोटासा स्क्रीन पेंटींगचा व्यवसाय करतात़ त्यांना व्यवसायात अधिकाधिक मदत करुन मिळालेल्या वेळेत अभ्यासाचे नियोजन करुन शहरातील मृणाल बत्तीसे याने 12 वीच्या परीक्षेत यश संपादन केले आह़े तळोद्यात तो प्रथम आला असून इलेक्ट्रीकल इंजिनिअर व्हायचे त्याचे स्वप्न आह़े
येथील शि़ल़ महाजन कनिष्ठ महाविद्यालयाचा मृणाल उदय बत्तीसे विद्यार्थी आह़े त्याने 12 वीच्या परीक्षेत 81.94 टक्के, गुण मिळविले आह़े तो संपूर्ण तळोदा केंद्रातून प्रथम आला आह़े मृणाल याची घरची आर्थिक परिस्थिती अतिशय बेताची आह़े त्यामुळे वडील कुटुंबाचा उदरनिर्वाहासाठी छोटासा स्क्रीन पेंटींगचा व्यवसाय करतात त्यांना एकटय़ाला व्यवसाय करणे शक्य नसल्याने मृणालही दिवसातून अधिकाधिक वेळ त्यांना हातभार लावत असतो़ परिणामी मिळालेल्या वेळेत मृणाल यास अभ्यासाचे नियोजन करावे लागत होत़े दहावीच्या परीक्षेतदेखील त्यास 92 टक्के गुण मिळाले होत़े त्याचा या यशात शि़ल़ माळी कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकांचे मार्गदर्शन मिळाले असल्याचे तो सांगतो़ प्रतिकूल परिस्थितीतूनही दैदिप्यमान यश मिळवणा:या मृणाल याचे अभियांत्रिकी शिक्षणाकडे कल असून इलेक्ट्रीकल इंजिनिअर होण्याचे त्याचे स्वप्न आह़े मृणालमध्ये काही तरी करुन दाखविण्याची चिकाटी असून या बळावरच त्याने हे यश मिळविले असल्याचे त्याचे शिक्षक प्रा़ पराग राणे यांनी सांगितल़े

Web Title: The first number in the center of the house by contributing to the home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.