जिल्ह्यातील पहिल्या साखर शाळेला लोणखेडय़ात सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2018 12:44 PM2018-11-24T12:44:44+5:302018-11-24T12:45:01+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : सातपुडा सहकारी साखर कारखान्याचे ऊस तोड कामगार बीड, गेवराई, चाळीसगाव, औरंगाबाद, पारोळा, धडगाव, मोलगी, ...
लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : सातपुडा सहकारी साखर कारखान्याचे ऊस तोड कामगार बीड, गेवराई, चाळीसगाव, औरंगाबाद, पारोळा, धडगाव, मोलगी, बायगोर या भागातून आले आहेत. या मजुरांच्या मुलां-मुलींना शिक्षणापासून वंचित राहता येवू नये यासाठी साखर शाळेचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार लोणखेडा गटातील साखर शाळेचा शुभारंभ गुरूवारी करण्यात आला.
याप्रसंगी सातपुडा कारखान्याचे कार्यकारी संचालक पी.आर. पाटील, शहादा पंचायत समितीच्या शिक्षण विस्तार अधिकारी ममता पटेल, लोणखेडय़ाच्या सरपंच कांताबाई प्रताप भिल, उपसरपंच कल्पनाबाई अशोक पाटील, शहादा तालुका काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष अशोक टिला पाटील, सरदार पटेल पतसंस्थेचे संचालक संजय दशरथ पाटील, दत्तू मंगळू पाटील, कारखान्याचे मॅनेजर गोपाळ पाटील, मुख्य शेतकी अधिकारी अजितकुमार सावंत, संपर्क अधिकारी प्रविण पाटील, लेबर ऑफिसर पुरूषोत्तम पाटील, लोणखेडा गट सुपरवायझर संजय बोरसे, साखर शाळा समन्वयक बळीराम महाजन आदी उपस्थित होते.
या वेळी शिक्षण विस्तार अधिकारी ममता पटेल यांनी सांगितले की, सातपुडा कारखान्याच्या साखर शाळेचा उपक्रम स्तुत्य असून, कारखान्याने केलेले हे शिक्षणाचे काम फार महत्त्वाचे आहे. वेगवेगळ्या ठिकाणाहून ऊस तोड कामागर आपल्या मुलांना शाळेपासून वंचित ठेवून सोबत आणतात. त्यामुळे साहजिकच त्यांचे शैक्षणिक नुकसान होते व शाळेत जाण्याची सवय त्यांच्यामधून निघून जाते.
या साखर शाळेच्या माध्यमातून त्यांना शिक्षण मिळून सातत्य टिकविण्यास मदत होते. शासनाकडून वह्या व पेन्सिलची व्यवस्था करण्याचे आवाहन त्यांनी केले.
कार्यकारी संचालक पी.आर. पाटील म्हणाले की, 2005 पासून सातत्याने दरवर्षी साखर शाळेचे आयोजन शासनाच्या मदतीशिवाय कारखान्याच्या गट कार्यालयाच्या क्षेत्रात 400 ते 500 विद्याथ्र्यासाठी साखर शाळा सुरू करून विद्याथ्र्याना शिक्षणाची सोय केली जाते. ऊस तोड कामगाराचा मुलगा ऊस तोड कामगार न राहता शिकला पाहिजे या उद्देशाने या शाळेचे आयोजन करण्याचे मार्गदर्शन संस्थापक चेअरमन कै.पी.के. पाटील यांनी केले असून, ते पुढे नेण्याचे काम चेअरमन दीपक पाटील हे सातत्याने करीत आहेत.
कार्यक्रमास सरदार पतपेढीचे संचालक संजय दशरथ पाटील यांनी विद्याथ्र्याना त्यांच्याकडून पाटय़ा वाटप केलञया. तसेच शहादा तालुका काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष अशोक पाटील व लोणखेडा ग्रामपंचायतीच्या उपसरपंच कल्पना पाटील यांनी विद्याथ्र्याना पोषण आहार देण्याचे जाहीर केले.
कार्यक्रमास विद्यार्थी, ऊस तोड कामगार व ग्रामस्थ उपस्थित होते. आभार मुख्य शेतकी अधिकारी अजितकुमार सावंत यांनी मानले.