पहिल्यांदाच मोबाईल ‘अॅप’व्दारे पशुगणना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2019 12:45 PM2019-01-20T12:45:30+5:302019-01-20T12:45:45+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात प्रथमच मोबाईल अॅपव्दारे पशुगणना करण्यात येत आह़े कर्मचा:यांना प्रशिक्षण देण्यासाठी मास्टर ट्रेनरची नियुक्ती ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यात प्रथमच मोबाईल अॅपव्दारे पशुगणना करण्यात येत आह़े कर्मचा:यांना प्रशिक्षण देण्यासाठी मास्टर ट्रेनरची नियुक्ती करण्यात आली आह़े पशुगणना करण्यासाठी जिल्ह्यात एकूण 167 टॅबचे वाटप करण्यात आले आह़े
पशुगणनेतील आकडेमोडीत कर्मचा:यांकडून होणा:या चुका टाळण्यासाठी तसेच पेपरलेस व्यवहार करण्यासाठी यंदा प्रथमच जिल्ह्यात अॅपव्दारे पशुगनणा करुन पशुसंवर्धन विभाग ‘डिजीटलायङोशन’च्या दिशेने वळत आह़े
अशा प्रकारे पशुगणना केल्यास कामात अधिक पारदर्शकता तसेच सुसूत्रता येत असल्याचे पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी डॉ़ शामकांत पाटील व डॉ़ क़ेटी़ पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितल़े दरम्यान, विभागातील चार कर्मचा:यांना यासाठी पुणे येथे प्रशिक्षणाला पाठविण्यात आले होत़े तेथे त्यांना या अॅपची माहिती देण्यात आली़ तसेच अॅपव्दारे कशा प्रकारे पशुगणना करण्यात येते, जनावरांच्या प्रकारानुसार त्यांची अॅपवर नोंद कशी करावी आदी विविध प्रकारची माहिती या कर्मचा:यांना मास्टर ट्रेनरकडून देण्यात आले आह़े त्यानुसार प्रत्येक कर्मचारी गावोगावी जावून दिलेल्या टॅबव्दारे जनावरांची माहिती संकलन करीत असल्याचे सांगण्यात आले आह़े या अॅपव्दारे कर्मचा:यांचे कागदोपत्री जाचही ब:याच प्रमाणात कमी झाले असून, एका क्लिकवर तालुकानिहाय माहिती उपलब्ध होणार असल्याने यामुळे वरिष्ठांना रिपोर्टीग करणे, रेकोर्ड ठेवणे आदी बाबींसाठीही हे सोयीस्कर होणार आह़े दरम्यान, नेहमीप्रमाणे या अॅपला ‘नेट कनेक्टीव्हीटी’ आवश्यक असल्याने दुर्गम भागात अडथळा निर्माण होण्याचीही शक्यता आह़े परंतु याबाबत उपाय योजना करण्यात येणार असल्याची माहिती आह़े अॅपव्दारे पशुगणना करण्यासाठी जिल्हाला एकूण 167 टॅब देण्यात आले आह़े तसेच हे अॅप स्मार्ट फोनवरही वापरता येणार आह़े याव्दारे करण्यात येणारी पशुगणनेची पध्दत अत्यंत साधी व सोपी असल्याने कर्मचा:यांना हे अधिक सोयीचे झाले आह़े या अॅपवर संकलित करण्यात आलेली माहिती थेट केंद्र शासनाला मिळणार आह़े