कापूस व्यापाऱ्याला साडेपाच लाखांचा गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2020 12:17 PM2020-12-20T12:17:41+5:302020-12-20T12:17:49+5:30

  लोकमत न्यूज नेटवर्क ब्राम्हणपुरी :  शहादा तालुक्यातील ब्राह्मणपूरी येथील कापसाचे अजेंट तळोद्याकडून येत असताना रात्री अकरा वाजेच्या सुमारास ...

Five and a half lakh rupees to a cotton trader | कापूस व्यापाऱ्याला साडेपाच लाखांचा गंडा

कापूस व्यापाऱ्याला साडेपाच लाखांचा गंडा

Next

  लोकमत न्यूज नेटवर्क
ब्राम्हणपुरी :  शहादा तालुक्यातील ब्राह्मणपूरी येथील कापसाचे अजेंट तळोद्याकडून येत असताना रात्री अकरा वाजेच्या सुमारास कुढावद- चिखली दरम्यान अज्ञान चोरट्यानी धारधार शस्त्र चा धाक दाखवून साडे पाच लाखाचा गंडा घातल्याची घटना शुक्रवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास घडली. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली असून कापूस व्यापारींमध्ये भितीचे वातावरण आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, ब्राह्मणपुरी येथील कापसाचे एजेंट पारसमल जैन हे नेहमी प्रमाणे कापूस खरेदी साठी तळोदा परिसरातील गावांमध्ये जात होते. 
तळोद्याकडून शुक्रवारी रात्री नऊ ते दहा वाजेदरम्यान आपल्या मोटार सायकल ने कापसाची एकूण रक्कम साडे पाच लाख रुपये घेऊन येत असताना रात्री अकरा वाजेच्या सुमारास शहादा तालुक्यातील कुढावद- चिखली गावा दरम्यान फरशी पुला नजीक   अज्ञान मोटारसायकलीवर व्यक्तीनी धार धार शस्त्र चा धाक दाखवून मोटार सायकल अडवून साडे पाच लाख रुपये ठेवलेली बॅग लंपास होऊन पसार    झाले. 
पारसमल जैन हे भयभीत होऊन आपला प्राण वाचवत ब्राह्मणपुरी येथे घर गाठून घडलेली आपभीती आपल्या कुटूंबियांना सांगितले. याबाबत पोलीसात कुठलीही नोंद करण्यात आलेली नव्हती. रात्रीच्या वेळी पोलिसांची गस्त वाढवावी अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांमधून करण्यात येत आहे. 
 

Web Title: Five and a half lakh rupees to a cotton trader

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.