तळोद्यात पाच जोडपी विवाहबद्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2019 12:56 PM2019-12-02T12:56:22+5:302019-12-02T12:56:28+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : माळी समाजातर्फे रविवारी येथे सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात पाच ...
लोकमत न्यूज नेटवर्क
तळोदा : माळी समाजातर्फे रविवारी येथे सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात पाच जोडप्यांचे मंत्रोपचाराने शुभमंगल लावण्यात आले. या वेळी वधू-वर पक्षाकडील व:हाडी व समाज बांधवांनी मोठय़ा संख्येने हजेरी लावून वातावरण मंगलमय बनले होते. सामूहिक विवाह सोहळ्यातील सागर कुटुंबातील विशाल या वराने सामूहिक विवाहातून बचत झालेली 51 हजाराची देणगी जाहीर केली. त्याच्या या स्तुत्य निर्णयाचे समाजाने कौतुक केले.
या विवाह सोहळ्याला खासदार डॉ.हीना गावीत, आमदार राजेश पाडवी, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे सिनेट सदस्य भरत माळी, माजी मंत्री अॅड.पद्माकर वळवी, नगराध्यक्ष अजय परदेशी, माजी आमदार उदेसिंग पाडवी, सहायक धर्मदाय आयुक्त सु.ज. लाड, माळी समज सुधारणा मंडळाचे अध्यक्ष नीलकंठ महाजन, शिंदखेडय़ाचे तहसीलदार सुदाम महाजन, नाशिकचे अतिरिक्त जिल्हाधिकारी निलेश सागर, अखिल भारतीय माळी महासंघाचे अध्यक्ष गोविंद डाके, पी.ई. सोसायटीचे अध्यक्ष लक्ष्मणराव माळी, अध्यापक शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा मंगला महाजन, देवमोगरा विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष चेतन पवार, कॉलेज ट्रस्टचे प्रभारी अध्यक्ष सुधीरकुमार माळी, सेवानिवृत्त न्यायाधीश सुनील मगरे, मुंबई येथील न्यायाधीश अजय मगरे, पालिकेचे प्रतोद संजय माळी, नगरसेवक हेमलाल मगरे, जितेंद्र माळी, नगरसेविका अंबिका शेंडे, नाशिक येथील सहायक पोलीस अधिकारी सारिका राणे, श्रीगोंदा येथील पोलीस उपनिरीक्षक अमित सूर्यवंशी, नाशिक येथील सी.ए. नीरज पिंपरे उपस्थित होते.
या सामूहिक विवाह सोहळ्यात पाच जोडपींचा विवाह लावण्यात आला. सोहळ्यासाठी समाज बांधव मोठय़ा संख्येने उपस्थित होते. समाज पंचाचे उपाध्यक्ष सुधीरकुमार माळी, सचिव उखा पिंपरे व कार्यकारणी सदस्य हिरालाल कर्णकार, चंद्रकांत राजकुळे, सुनील सूर्यवंशी, राजेश कर्णकार, बालू राणे, संतोष कर्णकार, अतुल सूर्यवंशी, वतनकुमार मगरे, संजय माळी, शशिकांत सूर्यवंशी, हेमलाल मगरे, शिरीष सोनेरी, अनिल मगरे, अरुण मगरे, योगेश्वर पंजराळे, मित्तलकुमार टवाळे, र}ाकर शेंडे, किरण सूर्यवंशी, भगवान मगरे, ईश्वर मगरे, लक्ष्मण सागर, पंकज राणे, किशोर सागर, पंकज मगरे, किरण राणे, सुरेश चव्हाण, वतनकुमार मगरे, शशिकांत सूर्यवंशी, हेमलाल मगरे, शिरीष सोनेरी, अनिल मगरे, अरुण मगरे, अजित टवाळे, योगेश्वर पंजराळे, मित्तलकुमार टवाळे, र}ाकर शेंडे, किरण सूर्यवंशी आदींनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन सुनील सूर्यवंशी, अरुण महाजन व अजित टवाळे यांनी केले.
गेल्या दीड-दोन महिन्यापूर्वी माळी समाजाने अनेक अनिष्ट चालीरिती बंद करण्याबाबत ठराव केले होते. त्यात लग्न वेळेवर लावणे, बॅण्ड बंदी, हळीदाचा कार्यक्रम कुटुंबापुरता मर्यादित असावा असे महत्त्वपूर्ण ठरावदेखील करण्यात आले होते. समाजाने या ठरावांची प्रभावी व प्रामाणिकपणे अंमलबजावणी केली आहे. ज्याठिकाणी विवाह झाले अशा सर्वच कुटंबांनी हळदीचा कार्यक्रम आटोपशीर व वेळेवर लग्न लावले. या निर्णयांमुळे वेळ व पैशांची बचत होण्यासही मदत मिळाली आहे. त्यामुळे समाजाचे कौतुक केले जात आहे.