नंदुरबारात पशुधनासाठी पाच दवाखान्यांची निर्मिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2018 12:39 PM2018-01-15T12:39:27+5:302018-01-15T12:39:32+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यातील पाळीव पशुंची योग्य सुश्रुषा करण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने पाच नवीन दवाखाने निर्माण करण्याचा निर्णय घेतला आह़े यातील चार दवाखाने हे स्थलांतरित तर एक दवाखाना हा नव्याने तयार होणार आह़े
शुक्रवारी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत नवापूर, तळोदा, अक्कलकुवा आणि शहादा तालुका पशुवैद्यकीय श्रेणी एकचे दवाखाने स्थलांतरित करण्यावर चर्चा करण्यात आली़ शहरी भागात असलेल्या या दवाखान्यांचा लाभ ग्रामीण भागात अधिक झाला पाहिजे, या विचारातून हे चार दवाखाने ग्रामीण भागात स्थलांतरित होणार आह़े यासाठी पदांना मजूंरी, खर्च याचे नियोजन जिल्हा परिषदेने करण्याचा निर्णय घेतला असून यासाठी शासनाकडे प्रस्तावही देण्यात आला आह़े जिल्ह्यात काही वर्षापूर्वी लघु पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालयाच्या स्थापनेमुळे जिल्हा परिषदअंतर्गत चालवल्या जाणा:या पशुवैद्यकीय श्रेणी एकचे दवाखाने ओस पडत होत़े याठिकाणी कर्मचा:यांच्या नियुक्त्या करूनही उपयोग होत नसल्याने पशुसंवर्धन विभागाने ग्रामीण भागात सेवा अधिक बळकट करण्याचा निर्णय घेतला असून त्यांतर्गत नव्या दवाखान्यांची निर्मिती आणि जुन्या दवाखान्यांचे स्थलांतर अशी मोहिम सुरू केली आह़े यात गेल्या काही महिन्यांपूर्वीच नंदुरबार येथील श्रेणी एकचा पशुवैद्यकीय दवाखाना हा रनाळे ता़ नंदुरबार येथे स्थलांतरित करण्यात आला होता़ नंदुरबार जिल्ह्यात एक लाख 29 हजार 629 दुधाळ गाई व म्हशी आहेत़ सोबत साडेचार लाख शेळ्या, दीड लाख बैल यासह इतर पाळीव जनावरे अशी एकूण 9 लाख जनावरे आहेत़ या पाळीव जनावरांवर सातत्याने उपचार आणि लसीकरण करण्यासाठी जिल्हा परिषदेकडून मोहिमा आखण्यात येतात़ यात पशुधन विकास अधिकारी आणि सहायक पशुधन विकास अधिकारी यांची रिक्त पदांमुळे अडचण निर्माण होत़े
अधिकारी आणि सहायक यांच्या पदासह परिचर आणि रूग्णसेवक या रिक्त पदांची भरती करण्याबाबतही प्रशासनाने सकारात्मक निर्णय घेण्याची गरज आह़े वर्ग तीन आणि वर्ग चारची पदभरती गेल्या काही वर्षात न झाल्याने पशुसंवर्धन विभागाकडे कर्मचारीच नसल्याचे सांगण्यात आले आह़े यामुळे संबधित विभागाच्या प्रशासकीय कामकाजावर परिणाम झाल्याचे दिसून आले आह़े
पाच तालुका मुख्यालयातील श्रेणी एकचे दवाखाने स्थलांरित झाल्यानंतर स्थानिक ग्रामपंचायतींच्या मालकीच्या इमारतींमध्ये सुरू करण्यात येणार आह़े याठिकाणी काही दिवस कामकाज करून या दवाखान्यांसाठी शासनाकडून त्या-त्या गावात इमारती उभारण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आह़े या इमारतींमुळे पाळीव गुरांवर दीर्घ उपचार आणि लसीकरण सोपे होणार आह़े