पाच लाखाचे अवैध लाकूड जप्त : तळोद्यातील चिनोदा चौफुलीवर पकडला ट्रक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2018 11:46 AM2018-02-04T11:46:15+5:302018-02-04T11:46:23+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
तळोदा : लाकडाची चोरटी वाहतूक करणा:या वाहनांचा येथील वनविभागाच्या पथकाने पाठलाग करून चिनोदा चौफुली नजिक पकडले. या ट्रकबरोबरच त्यातील पाच लाखाचे लाकूड जप्त केले आहे. ही कारवाई शनिवारी सकाळी केली. वनविभागाच्या या कारवाईमुळे लाकूड तस्करांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.
याबाबत वृत्त असे की, लाकडाने भरलेला ट्रक क्रमांक एच आर 57 - ए 2645 हा पहाटे पाच वाजेच्या सुमारास अक्कलकुव्याहून निघाल्याची खबर अक्कलकुवा व तळोदा वनविभागाच्या पथकास मिळाली होती. या पाश्र्वभूमिवर अक्कलकुवा येथील पथकाने या वाहनाचा पाठलाग थेट केला होता. ही खबर तळोद्याच्या पथकास देण्यात आली होती. या पथकाने सापळा रचून शहरापासून जवळ असलेल्या वळण रस्त्यावरील चिनोदा चौफुलीवर ट्रक पकडला. या वेळी वनविभागाच्या कर्मचा:यांनी ट्रकची झाडा झडती घेतल्यानंतर त्यात खैर व गंडोरी जातीचे लाकडे आढळून आली.
हा ट्रक वनविभागाने ताब्यात घेतल्यानंतर येथील उपवनसंरक्षक कार्यालयात आणला. याठिकाणी लाकडचा पंचनामा करण्यात आल्यानंतर साधारण 21.730 घटमीटर लाकूड मिळून आले. या मालाची किंमत पाच लाख व वाहनाचे 10 लाख असा एकूण 15 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. वाहन पकडल्याबरोबर चालक फरार होण्यात यशस्वी झाला आहे. ही कारवाई उपवनसंरक्षक अनिल थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक हेमंत शेवाळे, खापरचे वनक्षेत्रपाल ई.बी. चौधरी, वनपाल डी.डी. चौधरी, वनपाल एल.हच. सांगळे, वनरक्षक डी.के. सोनार, आर.एस. बैरागी, एम.बी. जाधव, एस.आर.देसले, एन.पी. पाटील यांच्या पथकाने केली. पुढील तपास उपवनसंरक्षक अनिल थोरात करीत आहेत. दरम्यान लाकडाची चोरटी वाहतूक करणा:या तस्करांवर कारवाईचा बडगा उभारण्यात आल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे.