नंदुरबार जिल्ह्यात कोरोनाचे पाच रुग्ण, प्रशासनाच्या चाचणी वाढविण्याच्या सूचना

By मनोज शेलार | Published: March 13, 2023 08:05 PM2023-03-13T20:05:23+5:302023-03-13T20:05:43+5:30

नंदुरबार : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढू लागला आहे. पाच दिवसांत पाच रुग्ण आढळून आले आहेत. ही बाब लक्षात ...

Five patients of corona in Nandurbar district, administration instructions to increase testing | नंदुरबार जिल्ह्यात कोरोनाचे पाच रुग्ण, प्रशासनाच्या चाचणी वाढविण्याच्या सूचना

नंदुरबार जिल्ह्यात कोरोनाचे पाच रुग्ण, प्रशासनाच्या चाचणी वाढविण्याच्या सूचना

googlenewsNext

नंदुरबार : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढू लागला आहे. पाच दिवसांत पाच रुग्ण आढळून आले आहेत. ही बाब लक्षात घेता प्रशासनाने कोरोना चाचणी वाढविण्याच्या सूचना दिल्या आहेत. 

आढळून आलेले रुग्ण हे नंदुरबार तालुक्यातील चार, तर शहादा तालुक्यातील एक आहे. त्यापैकी चार रुग्ण आयसोलेशनमध्ये असून एकावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जिल्हा परिषदेतील एक अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर खळबळ उडाली होती. त्यानंतर, पुन्हा चार रुग्ण आढळून आले आहेत. वाढत्या रुग्णसंख्येमुळे प्रशासनाची डोकेदुखीही वाढली आहे. वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता कोरोना चाचणी वाढवून संपर्कातील व्यक्तींचीही तपासणी करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.

Web Title: Five patients of corona in Nandurbar district, administration instructions to increase testing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.