पाच हजार विद्याथ्र्यानी साकारले तंबाखू मुक्तीचे बोधचिन्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2019 04:15 PM2019-02-03T16:15:43+5:302019-02-03T16:16:18+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील 28 शाळांमधील पाच हजार विद्याथ्र्यानी एकाच वेळी साकारलेले ‘च्यूस लाईफ नॉट टोबॅको’चे बोधचिन्हाने ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यातील 28 शाळांमधील पाच हजार विद्याथ्र्यानी एकाच वेळी साकारलेले ‘च्यूस लाईफ नॉट टोबॅको’चे बोधचिन्हाने आणि तंबाखू मुक्तीची घेतलेली शपथ हा एक नवीन रेकॉर्ड प्रस्थापीत झाला. पाच हजार विद्यार्थी आणि उपस्थितीत शिक्षक, पालक व अधिका:यांना खासदार डॉ.हिना गावीत यांनी शपथ दिली.
जिल्हा प्रशासन, रोटरी क्लब ऑफ नंदनगरी व सलाम फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा क्रीडा संकुलात शनिवारी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नंदुरबार आधीच तंबाखूमुक्त शाळांचा जिल्हा म्हणून घोषीत झाला आहे. आता शाळांव्यतिरिक्त संपुर्ण जिल्हा तंबाखुमुक्त व्हावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्याच अनुषंगाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार डॉ.विजयकुमार गावीत, जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुहास नाईक, जिल्हाधिकारी डॉ.एम.कलशेट्टी, नगराध्यक्ष परवेजखान, पोलीस अधीक्षक संजय पाटील, सहायक जिल्हाधिकारी वान्मती सी., अपर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी एन.डी.बच्छाव, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल पवार, सिमा अहिरे, रोटरीचे अध्यक्ष शब्बीर मेमन, निलेश तवंर आदी उपस्थित होते.
एवढय़ा मोठय़ा संख्येने विद्यार्थी एकत्र येत सामुहिक शपथ घेतल्याचा हा पहिलाच प्रयोग आहे. यावेळी बोलतांना खासदार डॉ.हिना गावीत यांनी सांगितले, जिल्हा व्यसनमुक्त व्हावा यासाठी जिल्हा प्रशासन आणि विविध समाजसेवी संस्थांचे प्रय} नक्कीच कौतूकास्पद आहे. निरोगी जीवनासाठी कुठल्याही प्रकारचे व्यसन करू नये. व्यसनांमुळे स्वत:चे जीवन तर उध्वस्त होतेच परंतु कुटूंब देखील उध्वस्त होते. त्यामुळे युवकांनी अशा व्यसनांपासून दूर राहावे आणि कुटूंब, समाज, देश विकासात सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले.
जिल्हाधिकारी डॉ.एम.कलशेट्टी यांनी सांगितले, राज्यात सर्वात जास्त तंबाखू मुक्तीचे काम जिल्ह्यात झाले आहे. यासाठी शाळेतील विद्याथ्र्याचा सहभाग मोठय़ा प्रमाणात होता. जिल्हा संपुर्णपणे व्यसनमुक्त होईल यासाठी सर्व स्वयंसेवी संस्था, महाविद्यालये, विद्यालय आणि प्रशासनाला मोठय़ा प्रमाणावर काम करावे लागणार आहे. भविष्यात ही चळवळ लोकचळवळ होईल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.
बोधचिन्ह रेखाटन करण्यासाठी कला शिक्षक राजेंद्र ठाकरे, डी.डी.कुलकर्णी, अशोक मराठे, दिपक माळी, संतोष पाडवी, प्रकाश सोनवणे यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचलन पत्रकार रणजीत राजपूत यांनी केले. आभार नवनिर्माण समाज हितार्थ संस्थेचे रवी गोसावी यांनी मानले.