‘तेजस’च्या ‘कॉकपीट’मधून संकल्पाचे उड्डाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2017 12:32 PM2017-09-29T12:32:42+5:302017-09-29T12:32:42+5:30
धडगाव ते इस्त्रो : शास्त्रज्ञ विजय पाटील यांचा विद्याथ्र्यासोबत संवाद
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : देशात पूर्णपणे विकसित झालेल्या पहिल्या ‘लाईट कॉम्बॅट एअरक्राफ्ट तेजस’ विमानाची नियंत्रण यंत्रणा तयार करणारे डॉ़ विजय पाटील यांच्या सान्निध्यात विद्याथ्र्यांनी तेजसच्या निर्मितीची यशोगाथा अनुभवली, डॉ़ पाटील यांनी विद्याथ्र्याना अप्रत्यक्षपणे तेजसच्या कॉकपीटची सफर घडवून आणत, संकल्पाची ’उडान’ भरण्याचा सल्ला दिला़
नंदुरबार शहरातील इंदिरा मंगल कार्यालयात लायन्स आणि लायनेस क्लबच्या माध्यमातून जिल्ह्याचे सुपूत्र आणि तेजस या लढाऊ विमानाच्या निर्मितीत मोलाची भूमिका बजावणारे शास्त्रज्ञ डॉ़ विजय पाटील यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होत़े कार्यक्रमाच्या सुरूवातीला देशाचे माजी राष्ट्रपती डॉ़ ए़पी़ज़ेअब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आल़े
‘उडान धडगाव ते इस्त्रो’ या शिर्षकाखाली झालेल्या कार्यक्रमात शहरातील विविध कनिष्ठ महाविद्यालयीन विद्याथ्र्याचा सहभाग होता़ विद्याथ्र्यासोबत थेट संवाद साधताना शास्त्रज्ञ डॉ़ विजय पाटील यांनी विमानाच्या निर्मितीचा इतिहास ते आजच्या तंत्रज्ञानातील विविध बदल यांची माहिती दिली़
डॉ़ विजय पाटील म्हणाले की, नंदुरबार ही शहीद शिरीषकुमार यांच्यानावाने संपूर्ण जगात ओळखलं जातं, आणि मी या जिल्ह्याचा रहिवासी असल्याचा मला अभिमान आह़े प्रत्येक व्यक्ती हा आयुष्यभर विद्यार्थी असतो, त्यासाठी लागणारी जिज्ञासा ही जागृत ठेवली पाहिज़े या जिज्ञासेला निरीक्षणाची जोड दिल्यास पुढे जाताच येते, मार्ग सुकर होतात़ यातूनच तेजस या विमालाचा जन्म झाला, यामुळे जागतिक पातळीवर आपण काय करू शकतो हे जागतिक विमानोद्योगाला यातून दिसून आले आह़े प्रत्येक कार्य करण्यासाठी एक प्रेरणा लागते, ही प्रेरणा माणसाला निसर्गानेच दिली आह़े पक्ष्यासारखं उडता यावं, असा ध्यास माणसाने घेतल्याने त्याला विमानाचा शोध लागला़ शास्त्रज्ञ डॉ़ पाटील यांनी कागदाच्या सहाय्याने विमान तयार करून सोप्या पद्धतीने विमानाची ‘उड्डाण’ प्रक्रिया समजावून सांगितली़ पॉवर पॉईंट प्रेङोंटेशन आणि व्हीडीओ यांच्या माध्यमातून ‘तेजस’ निर्मितीची कथा आणि प्रक्रियाही त्यांनी उपस्थित विद्याथ्र्याना समजावून दिली़
विमान निर्मितीची इतिहास सांगताना डॉ़ विजय पाटील यांनी विमान ही संकल्पना केवळ भारतीय पौराणिक कथांमध्ये नसून ग्रीक पुराण कथांमध्ये असलेला संदर्भ दिला़ तसेच अजिंठा आणि वेरूळच्या लेण्यांमधील विमानाच्या चित्राचा संदर्भ देत त्यांनी विद्याथ्र्याना खिळवून ठेवल़े
विमानाचा इतिहास सांगताना त्यांनी हेलिमय गॅसपासून चालवले जाणारे महाकाय फुगे व त्यातून होणारी प्रवासी वाहतूक, 1937 मध्ये दुर्घटनेनंतर त्यांचा बंद झालेला वापर, 18 व्या शतकात जॉर्ज कॅले या शास्त्रज्ञाने लावलेला पॅराग्लायडरचा शोध, 1903 मध्ये राईट बंधूंनी लावलेला विमानाचा शोध, त्यांचे 12 सेकंदाचे उड्डाण, 120 फूटावरून कोसळलेले राईट बंधू अशा रोचक विज्ञानकथा सांगत, डॉ़ कल्पना चावला, सुनिता विल्यम्स, विक्रम साराभाई, भारतरत्न डॉ़ ए़जी़ज़े अब्दुल कलाम यांच्या विविध कार्याची माहिती दिली़ त्यांनी इस्त्रो या संस्थेने अंतराळ विज्ञानात केलेल्या प्रगतीचा आढावाही घेतला़
कार्यक्रमास लायनेस क्लबचे अध्यक्ष जितेंद्र जैन, लायनेसच्या अध्यक्षा प्रा़ ज्योती महंत, लायन्स फेमिना सुप्रिया कोतवाल, डॉ़ विजय पटेल, दिनेश वाडेकर, डॉ़ पंकज पाटील, डॉ़ जयवंत शाह, चंदर मंगलाणी, शंकर रंगलाणी, श्रीराम मोडक, जगदीश सोनी, भावना पटेल, श्रीराम दाऊतखाने, हितेंद्र शाह, राहुल पाटील, व्ही़डी़ चौधरी, डॉ़ नूतन शाह, डॉ़ अजरुन लालचंदाणी, शितल पटेल, अनिल पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होत़े सूत्रसंचालन सीमा मोडक यांनी तर आभार दिनेश वाडेकर यांनी मानल़े