अक्कलकुवा तालुक्यातील नद्यांना पूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2019 12:19 PM2019-08-05T12:19:35+5:302019-08-05T12:19:40+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क अक्कलकुवा : संततधार पावसामुळे परिसरातील जनजीवन विस्कळीत झाल़े तालुक्यातून वाहणा:या वरखेडी नदीसह देहली आणि देववारली नदी, ...

Floods of rivers in Akkalkuwa taluka | अक्कलकुवा तालुक्यातील नद्यांना पूर

अक्कलकुवा तालुक्यातील नद्यांना पूर

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

अक्कलकुवा : संततधार पावसामुळे परिसरातील जनजीवन विस्कळीत झाल़े तालुक्यातून वाहणा:या वरखेडी नदीसह देहली आणि देववारली नदी, यांना मोठा पूर आला़ यातून सोरापाडा येथील कालिका माता मंदिरालगतच्या झोपडय़ा पाण्याखाली गेल्या आहेत. पावसामुळे वरखेडी नदीची संरक्षक भिंत कोसळून नुकसान झाल़े पावसामुळे अक्कलकुवा येथून सुटणा:या बसेसच्या फे:या रद्द करण्यात आल्या होत्या़ 
तालुक्यात 10 दिवसांपासून पावसाचा जोर कायम आह़े शनिवारी रात्रीपासून मुसळधार पावसाने सातपुडय़ातील गावांना झोडपून काढल़े यातून नदी नाले ओसंडून वाहू लागले आहेत़ अक्कलकुवा शहरात पाणी तुंबल्याने नागरिरकांचे हाल झाल़े वरखेडी नदीच्या पुरामुळे बसस्थानकालगत बांधलेल्या वरखेडी नदीवरील संरक्षक भिंतीचा मोठा भाग कोसळला़ गटसाधन केंद्र, न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज प्रांगणात पाणी साचले आह़े इंदिरा नगरच्या पाठीमागे संपूर्ण शेतांचा परिसर आह़े पाण्याचा निचरा होण्यासाठी जागाच नसल्यामुळे इंदिरा नगर भागातील अरुंद रस्त्यांवर गुडघ्याएवढे पाणी साचू होत़े बाजारपेठेत पाणी आल्याने किरकोळ व्यवसाय बंद पडल़े सीतानगर भागात पहाटे महामार्गालगत असलेल्या गटारीत पाणी साचल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. पुरामुळे बाधित झालेल्या सोरापाडय़ाच्या नागरिकांना सेवाभावींनी हात दिला़
मिठय़ाफळी भागातील घरांमध्ये नाल्याचे पाणी शिरल्याने नागरिकांचे हाल झाल़े  पुराच्या पाण्यामुळे अक्कलकुवा येथून सुटणा:या पुणे, मुंबई, जळगांव, बडोदा अहमदाबाद मार्गावरील तसेच मोलगी, धडगाव, कोयलीविहिर मार्गावरील बसेस रद्द करण्यात आल्या़ गुजरात राज्यातून महाराष्ट्रातील जाणा:या बसेस अक्कलकुवा येथून माघारी फिरल्या़ दिवसभरात येथून खापर ते नंदुरबार अशी एकच बस धावली होती़ 
 

Web Title: Floods of rivers in Akkalkuwa taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.