पुराच्या पाण्याने तळोदा तुंबले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2019 12:14 PM2019-08-05T12:14:58+5:302019-08-05T12:15:08+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : शहरासह संपूर्ण तालुक्यात शनिवारी मध्यरात्रीपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आले होत़े खर्डी व ...

The floodwaters swelled with water | पुराच्या पाण्याने तळोदा तुंबले

पुराच्या पाण्याने तळोदा तुंबले

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

तळोदा : शहरासह संपूर्ण तालुक्यात शनिवारी मध्यरात्रीपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आले होत़े खर्डी व भवर नदीचे पुराचे पाणी नदी काठच्या वसाहती, मुख्य बाजारपेठेत शिरल्याने घरांचे नुकसान झाले आह़े पुराच्या पाण्यामुळे तळोदा शहर पूर्णपणे जलमय झाले होत़े यातून पुलांच्या परिसरात नागरिकांनी जाऊ नये पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता़ 
तळोदा शहराबरोबरच संपूर्ण तालुक्यात गेल्या सात आठ दिवसांपासून संततधार पाऊस सुरु आह़े त्यात शनिवारी मध्यरात्रीपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली़ शहरातून वाहणा:या खर्डी व भवर नदीचे पाणी कॉलेजरोडकडून सखल भागात साचल्यामुळे रस्त्यावरील घरे, दुकाने पाण्यात गेली़ यातून व्यावसायिकांचे नुकसान झाल़े खर्डी नदी काठालगत डीबी हाटी, मोठी हाटी, विद्यानगरी, कालिका माता मंदीर गल्ली, संत रोहिदासवाडा आणि उपजिल्हा रुग्णालय आवारात पाणी गेल्याने नुकसान झाल़े भवर नदीचे पाणी कॉलेज रोडवरील भरवाड वसाहतीत शिरल्याने 20 घरांचे नुकसान झाल़े शहरालगतच्या नवीन वसाहतींमुळे गटारींची व्यवस्था नसल्यामुळे वसाहतींमध्ये प्रचंड पाणी साचले होत़े पुरामुळे अक्कलकुवा मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती़  मोठय़ा कालावधीनंतर खर्डी नदीला पूर आल्यामुळे शहरातील नागरिकांनी काठावर गर्दी केली होती़ यातून अनुचित प्रकार घडू नये, म्हणून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता़ 
नगराध्यक्ष अजय परदेशी, पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण, मुख्याधिकारी सपना वसावे यांनी याठिकाणी भेटी देत पाहणी केली़ रविवारी दुपार्पयत नागरिक व व्यावसायिक घरात शिरलेले पाणी बाहेर काढण्याच्या प्रयत्नात होत़े जागोजागी साचलेल्या पाण्यामुळे वीज वितरण कंपनीचा भोंगळ कारभार समोर आला़ फ्यूजपेटय़ांमध्ये पाणी गेल्याने वीज पुरवठा दिवसभर बंद होता़ शहरातील ज्या घरात नुकसान झाले आहे अशा ठिकाणी पंचनामे करण्यासाठी महसूल विभागाने पथकांची नियुक्ती केली आह़े प्रांताधिकारी जितेंद्र डुडी, तहसीलदार पंकज लोखंडे, नायब तहसीलदार श्रीकांत लोमटे यांनी भेट देत पाहणी केली़ शासकीय मदत मिळवून देण्यासाठी तातडीने पंचनामे करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आल़े 

मोड येथील सरदार सरोवर बाधितांच्या वसाहतीत पाणी शिरल्याने 36 घरांचे नुकसान झाल़े प्रशासनाने त्यांना मोड येथील शाळेत स्थलांतरित करत सोय केली़ चौगाव, रेवानगर, दलेलपूर, त:हावद, सरदारनगर याठिकाणीही पुराचे पाणी शिरल्याने घरांचे नुकसान झाले आह़े पावसामुळे शहर आणि तालुक्यात कोणत्याही प्रकारे जीवितहानी झालेली नसल्याचे तालुका प्रशासनाकडून कळवण्यात आले आह़े 
 

Web Title: The floodwaters swelled with water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.