पाण्याचे वॉटर ऑडीटसाठी आता फ्लो वॉटर मिटर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2019 04:48 PM2019-01-25T16:48:45+5:302019-01-25T16:50:13+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : नंदुरबार पालिकेला पाणी पुरवठा करणा:या विरचक प्रकल्पातील दोन्ही मुख्य जलवाहिनींवर वॉटर फ्लो मिटर बसविण्यात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : नंदुरबार पालिकेला पाणी पुरवठा करणा:या विरचक प्रकल्पातील दोन्ही मुख्य जलवाहिनींवर वॉटर फ्लो मिटर बसविण्यात येत आहे. यामुळे धरणातील किती पाणी पालिका घेते, प्रत्यक्षात किती पाणीपुरवठा होतो याची नोंद ठेवली जाणार आहे. या कामाला गुरुवारी सुरुवात करण्यात आली. यामुळे शहराचा पाणी पुरवठा दोन दिवस बंद ठेवण्यात आला आहे. दरम्यान, शहराचे लवकरच वॉटर ऑडीट केले जाणार असून त्यानंतर सध्याच्या उन्हाळ्यात पाणी पुरवठा किती काळ करावा याचा निर्णय घेतला जाणार आहे.
नंदुरबार शहराला शिवण नदीवरील विरचक प्रकल्पातून मुख्यत: पाणी पुरवठा केला जातो. याशिवाय 25 ते 30 टक्के भागात आंबेबारा धरणातील पाण्याचा आष्टे पंपींग स्टेशनमधून उपसा करण्यात येतो. शासनाच्या आदेशानुसार आता ज्या धरणातून, प्रकल्पातून किंवा विहिरीतून पाणी घ्यावयाचे असेल तर त्यासाठी वॉटर फ्लो मिटर बसविणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यानुसार पालिकेने विरचक प्रकल्पातील दोन पाईपलाईनवर अशा प्रकारचे वॉटर मिटर बसविण्यास सुरुवात केली आहे.
500 मि.मी.जलवाहिन्या
विरचक प्रकल्पात असलेल्या इंटकवेल मधून पाणी उपसा करण्यासाठी 500 मि.मी.च्या दोन जलवाहिन्या आहेत. त्यातील पाणी तेथेच असलेल्या जलशुद्धीकरण प्रकल्पात टाकले जाते. या दोन्ही जलवाहिन्यांवर 450 मि.मी. आकाराच्या पाईपमध्ये हे वॉटर फ्लो मिटर बसविण्यात येत आहे. गुरुवारी सकाळी 10 वाजता या कामाला सुरुवात करण्यात आली. पाणी पुरवठा विभागाचे सभापती कैलास पाटील यांच्यासह अभियंता व सर्व कर्मचारी या ठिकाणी दिवसभर ठाण मांडून होते. गुरुवारी सायंकाळर्पयत 70 टक्के काम पुर्ण करण्यात आले होते. मध्यरात्रीर्पयत काम पुर्ण करून लागलीच पाणी पंपींग करण्यास सुरवात होण्याची शक्यता आहे. जर काही तांत्रिक अडचणी आल्या नाहीच तर शुक्रवार, 25 रोजी दुपार्पयत काही भागातील पाणी पुरवठा सुरू करण्याचे नियोजन पाणी पुरवठा विभागाने करून ठेवले आहे.
अंदाजे मोजमाप
आतार्पयत अंदाजे पाण्याचे मोजमाप केले जात होते. पाणी उपसा करणा:या विद्युत मोटारींची क्षमता, त्या किती तास चालल्या त्यावरून पाणी उपसाचा अंदाज काढला जात होता. तो अंदाज अचूक राहत नव्हता. त्यामुळे वॉटर ऑडीट करतांना किंवा धरणातील किती पाणीसाठा उचलला हे जाणून घेण्यासाठी अंदाजे आकडेवारी समोर आणावी लागत होती. आता वॉटर फ्लो मिटरमुळे ती आकडेवारी अचूक मिळणार आहे.
पाणीसाठा आरक्षीत
शहराला पाणी पुरवठासाठी विरचक प्रकल्प पुर्ण क्षमतेने भरला तर 50 टक्के पाणीसाठा हा पालिका आरक्षीत करतो. जर 60 टक्केपेक्षा कमी पाणीसाठा झाला तर संपर्ण पाणीसाठा आरक्षीत केला जात असतो. यंदा तर केवळ 41 टक्केच पाणीसाठा झाल्याने संपुर्ण पाणीसाठा पालिकेने आरक्षीत केला आहे.
अशीच स्थिती आंबेबारा धरणातील आहे. तेथील पाणीसाठा देखील पालिकेने आरक्षीत करून घेतला आहे. त्यामुळे दुष्काळी स्थिती असूनही यंदा शहरवासीयांना पाणी टंचाईच्या स्थितीला फारसे सामोरे जावे लागणार नसल्याचे चित्र आहे.