बदलत्या जीवनशैलीमुळे ‘मनोविकारा’त भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2019 11:55 AM2019-10-10T11:55:41+5:302019-10-10T11:55:47+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात अनुवांशिकपणे निर्माण झालेल्या आजाराची समस्या गंभीर बनली आहे. असे असतानाच धावपळ, वाढती स्पर्धा, ...

Focus on 'psychosis' due to changing lifestyle | बदलत्या जीवनशैलीमुळे ‘मनोविकारा’त भर

बदलत्या जीवनशैलीमुळे ‘मनोविकारा’त भर

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यात अनुवांशिकपणे निर्माण झालेल्या आजाराची समस्या गंभीर बनली आहे. असे असतानाच धावपळ, वाढती स्पर्धा, कामांचा वाढता ताण अशा बदलत्या जीवनशैलीमुळे मनोविकारात अधिक भर पडत आहे. त्यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत केवळ सहा महिन्यातच एकुण चार हजार रुग्णांवर उपचार करण्यात आला आहे.
मानवाच्या न दिसणा:या आजारांमध्ये मनोविकार हा एक प्रमुख आजार असून या आजाराचे प्रकार वेगवेगळे आहेत, त्यांची कारणेही वेगवेगळी दिसून येतात. त्यात जैविक हे प्रमुख कारण असल्याचे म्हटले जात आहे. त्यात अनुवांशिकता, रसायनांचे कमी-अधिक प्रमाण, मानसशास्त्रीय कारण ही आहेत. बदलती जीवनशैली हे देखील मनोविकाराचे एक मोठे कारण आहे. बदलत्या जीवनशैलीतील कारणांमध्ये ताणतणाव, वाढती स्पर्धा, धावपळ, चिंता, कामांना वाढता ताण यासह अनेक कारणांचा उल्लेख करता येतो.  समाजात अनुवांशिक प्रकारातील प्रामुख्याने मनोविकारच आढळून येत होता.  परंतु दिवसेंदिवस जीवनशैलीत आमुलाग्र बदल होऊ लागल्यामुळे मनोविकाराच्या समस्यांमध्ये अन्य प्रकाराचा देखील शिरकाव झाल्याचे म्हटले जाते. सातत्याने चिंतन करणा:या व्यक्तींमध्ये हा आजार अधिक दिसून येतो. अनुवांशिकपणे जडलेल्या मनोविकाराची समस्या गंभीर झाली. अनुवांशिकनंतर बदलत्या जीवनशैलीमुळेही मनोविकारात अधिक भर पडू लागली आहे.
या समस्येवर मात करण्यासाठी जिल्ह्यात आरोग्य प्रशासनामार्फत नेहमीच विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. गाव पातळीवरही मागील तीन वर्षापासून मानसोपचार पथक विविध घटकाच्या माध्यमातून जनजागृती करीत आहे. नंदुरबार जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत एप्रिल ते सप्टेंबर या सहा महिन्याच्या कालावधी बाह्यरुग्ण विभागात तीन हजार 340 तर आंतररुग्ण विभागातून 201 रुग्णांवर उपचार करण्यात आले. याशिवाय मासिक भेटींतर्गत 646 अशा एकुण चार हजार 187 रुग्णांवर उपचार झाल्याची नोंद जिल्हा सामान्य रुग्णालयात करण्यात आली आहे. 

जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त दि.10 आक्टोबरपासून जिल्ह्यात जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत जनजागृतीसाठी सप्ताह राबविण्यात येत आहे. यात गुरुवारी जिल्हा रुग्णालयात रांगोळी स्पर्धा व पथनाटय़, शुक्रवारी नर्सिग महाविद्यालय पथराई येथे भित्तीपत्रक स्पर्धा, शनिवारी समाजकार्य महाविद्यालय, तळोदा येथे भित्तीपत्रक व निबंध स्पर्धा  दि. 14 रोजी पाडळदा येथे मानसिक आरोग्य शिबीर,  दि. 15 रोजी ग्रामीण रुग्णालय म्हसावद येथे मासिक बाह्यरुग्ण तपासणी व जनजागृती कार्यक्रमतर  दि. 16 रोजी जिल्हा रुग्णालय नंदुरबार येथे बक्षीस वितरण असे कार्यक्रम होणार आहे. 

स्पर्धामुळे मनोविकाराची समस्या गंभीर बनली आहे. त्यात झोप न लागणे, अनियमित आहार, अस्वस्थता ही कारणे प्रमुख ठरतात.
कामांचा ताण व अन्य ताणतणांमुळे नोकरदारांमध्ये मानसिक समस्यांचे प्रमाण अधिक दिसून येते.
नंदुरबारात बाहेरुन येणा:या काही डॉक्टरांमार्फतही केला जातो उपचार.
 

Web Title: Focus on 'psychosis' due to changing lifestyle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.