जीर्ण बंधाºयांच्या दुरुस्तीसाठी पाठपुरावा

By admin | Published: March 29, 2017 11:49 PM2017-03-29T23:49:45+5:302017-03-29T23:49:45+5:30

जिल्हाधिकाºयांना निवेदन : कार्यवाही करण्याची मागणी

Follow-up for repair of chained bonds | जीर्ण बंधाºयांच्या दुरुस्तीसाठी पाठपुरावा

जीर्ण बंधाºयांच्या दुरुस्तीसाठी पाठपुरावा

Next

नंदुरबार : तालुक्यातील रनाळे ते नंदुरबार या दरम्यान नदी-नाल्यात उभारण्यात आलेले बंधारे जीर्ण होऊन निरुपयोगी झाले आहेत़ या बंधाºयाची दुरुस्ती करण्याची मागणी ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे़
या निवेदनात म्हटले आहे की, रनाळे येथे दोन किलोमीटर अंतरात गट क्रमांक ५०१, ५०२, ३११, ३१९, ४३१ व ४३२ येथे साठवण बंधाºयांची निर्मिती करण्यात आली आहे़ हे बंधारे अत्यंत हलक्या दर्जाचे असल्याने त्यांच्या गेल्या अनेक वर्षात पाणीसाठा झालेला नाही़ खालच्या बाजूने या बंधारे जागोजागी उखडले आहेत़ पाणी थेट वाहून जात असल्याने समस्या निर्माण झाली आहे़ याच भागात ५०१ व ५०२ या गटातील सिंचन बंधाºयांच्या जवळ गावाला पाणीपुरवठा करणारी विहीर आहे़ या बंधाºयाच्या निर्मितीवेळी विहिरींना पाणी मिळण्याची अपेक्षा होती़ मात्र हे बंधारेच कोरडे असल्याने विहिरींची पातळी खालावली आहे़ याबाबत ग्रामस्थांनी कृषी विभाग आणि जिल्हा परिषद यांच्याकडे सातत्याने तक्रारी करूनही कारवाई करण्यात आलेली नाही़ या विभागाना जिल्हा प्रशासनाने समज देऊन कारवाई करण्याची मागणी आहे़ निवेदनावर ग्रामस्थांच्या स्वाक्षºया आहेत़
रनाळे परिसरातील जीर्ण बंधाºयाची नव्याने निर्मिती करण्यासोबतच चांगल्या स्थितीत असलेल्या बंधाºयांची दुरुस्ती पावसाळ्यापूर्वी करण्याची मागणी आहे़ तसेच बंधाºयामध्ये मोठ्या प्रमाणात अडकलेला गाळ काढून शेतकºयांना देण्याची मागणी करण्यात आली आहे़

Web Title: Follow-up for repair of chained bonds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.