दहा ठरावांद्वारे आदिवासी खर्चिक रूढींना आळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2018 12:55 PM2018-04-30T12:55:40+5:302018-04-30T12:55:40+5:30

गावागावात होणार स्थलांतरितांची नोंद

Follow tribal tribal customs through ten resolutions | दहा ठरावांद्वारे आदिवासी खर्चिक रूढींना आळा

दहा ठरावांद्वारे आदिवासी खर्चिक रूढींना आळा

googlenewsNext

लोकमत ऑनलाईन
नंदुरबार, दि़ 30 : सातपुडय़ातील सर्वाधिक गंभीर अशा स्थलांतराच्या मुद्दय़ाला स्थानिकांनी हात घालून गावागावात नोंदी करण्याचा ठराव करून घेतला आह़े यातून स्थलांरितांची संख्या समजून येऊन उपाययोजना करण्यात मदत होणार आह़े  
अक्कलकुवा ता़ मोलगी येथे शनिवारी सातपुडा आदिवासी युवक मित्र मंडळ व विचार मंच मोलगी यांच्यावतीने आदिवासी दहेज नियमन परिषदेचे आयोजन करण्यात आले होत़े या परिषदेत 10 ठराव करण्यात आल़े यात प्रामुख्याने दहेज नियमन आणि स्थलांतराच्या समस्येवर चर्चा करण्यात येऊन विविध उपाय सुचवण्यात आल्या़ या परिषदेस अॅड़ सरदारसिंग रूपसिंग वसावे, अॅड़ गजमल रतनसिंग वसावे, अॅड़ वैशाली वळवी, अनिल वसावे, कांतीलाल वसावे, प्रतापसिंग वसावे, विशाल वसावे, रणजीत वसावे, गुलाबसिंग वसावे, सोन्या वसावे, जितू वसावे, निलीमा सुरेश वसावे यांच्यासह गावांचे सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, पुजारी, ज्येष्ठ नागरिक यांच्यासह परिसरातील 25 गावातील आदिवासी बांधव व महिला मोठय़ा संख्येने उपस्थित होत़े 
परिषदेचे प्रास्ताविक रवि वसावे यांनी केल़े सूत्रसंचालन गजमल वसावे यांनी केल़े आदिवासी विवाह दहेज ठरावानुसार 1 ते 45 हजार रूपयांर्पयत समान लागू करण़े 
बालविवाह पद्धतीवर बंदी आणण़े सोंगडो पद्धतीवर ठराव करण़े आदिवासी प्रथा परंपरा रितीरिवाजाप्रमाणे ढोल वाद्याद्वारे लगA साजरा करण़े आदिवासी स्वकुळ, बहुपत्नीत्व यावर बंदी करण़ेदोन विवाह करणा:यांना समितीमार्फत दंड आकारण़े एखाद्याने पहिल्या पत्नीला मूलबाळ असताना दुसरा विवाह केल्यास पहिली पत्नी आणि संततीचे पालनपोषण करण्यासाठी पैसे व इतर हक्क देण्यात यावा़ अशा व्यक्तींना समिती दंडही करेल़ आदिवासी दिवाळी, यात्रा व होळी या अधिकृत परंपरेशिवाय खाजगीसोंगाडय़ा पार्टीवर बंद आणण़े स्थलांतरित मजुरांची अधिकृत नोंदणी करण़े पालक आणि मुलीची सहमती नसताना मुलीला पळवून नेणा:यास दंड करण़े 
 

Web Title: Follow tribal tribal customs through ten resolutions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.